एक नंबर तुझी कंबर! 'रात्रीस खेळ चाले' मधील वच्छीला पडली ट्रेंडिंग गाण्याची भुरळ, व्हिडीओ बघाच 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 12:51 IST2025-06-26T12:48:50+5:302025-06-26T12:51:09+5:30

एखादं गाणं सोशल मीडियावर व्हायरल झालं की त्यावर डान्स करण्याचा मोह कोणालाच आवरत नाही.

marathi television actress sanjivani patil dance on sanju rathod trending shaky song video goes viral | एक नंबर तुझी कंबर! 'रात्रीस खेळ चाले' मधील वच्छीला पडली ट्रेंडिंग गाण्याची भुरळ, व्हिडीओ बघाच 

एक नंबर तुझी कंबर! 'रात्रीस खेळ चाले' मधील वच्छीला पडली ट्रेंडिंग गाण्याची भुरळ, व्हिडीओ बघाच 

Sanjeevani Patil Dance Video: एखादं गाणं सोशल मीडियावर व्हायरल झालं की त्यावर डान्स करण्याचा मोह कोणालाच आवरत नाही. आताच्या गाण्यांचा ट्रेंड इन्स्टाग्रामवरून ठरतो. एखादं गाणं इन्स्टाग्रामवर लोकप्रिय झालं तर त्यावर अनेकजण रिल्स बनवतात. सध्या सोशल मीडियावर संजू राठोडचं 'एक नंबर, तुझी कंबर' हे गाणं ट्रेंडिंगवर आहे  अगदी चिमुकल्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकजण या गाण्यावर ठेका धरताना पाहायला मिळतो आहे. अशातच या गाण्यावर रात्रीस खेळ चाले मालिकेतील वच्छीचं पात्र साकारणारी अभिनेत्री संजीवनी पाटीलने (Sanjeevani Patil)  भन्नाट डान्स केला आहे. ज्याची सगळीकडे चर्चा होत आहे. 


सध्या सोशल मीडियावर संजीवनी पाटीलचा हा डान्स व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. शेकी शेकी या गाण्यावर थिरकण्याचा मोह तिला आवरला नाही. "Can't stop myself ...", असं कॅप्शन देत अभिनेत्रीने हा डान्स व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. संजीवनी पाटीलचा हा डान्स व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊसच पाडला आहे. खूपच छान...", एक नंबर मॅम... अशा कमेंट्स करत चाहत्यांनी अभिनेत्रीचं कौतुक केलं आहे. 

अभिनेत्री संजीवनी पाटीलच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती 'रात्रीस खेळ चाले' या लोकप्रिय मालिकेत 'वच्छी' या भूमिकेत दिसलेली . तिची वच्छी ही भूमिका तुफान गाजली.  अलिकडेच अभिनेत्री 'लय आवडतेस तू मला' या मालिकेत पाहायला मिळाली. 

Web Title: marathi television actress sanjivani patil dance on sanju rathod trending shaky song video goes viral