"त्याने मला जेव्हा पाहिलं...", मराठी अभिनेत्रीसोबत हिंदी सिनेमाच्या सेटवर 'असा' वागायचा राजकुमार राव, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 12:17 IST2026-03-27T12:15:06+5:302026-03-27T12:17:07+5:30

"आम्ही एकमेकांशी...", मराठी अभिनेत्रीने सांगितला राजकुमार रावसोबत काम करण्याचा अनुभव,म्हणाली- "तो खूप..."

marathi television actress reena madhukar share working experience with rajkumar rao in talaash movie says  | "त्याने मला जेव्हा पाहिलं...", मराठी अभिनेत्रीसोबत हिंदी सिनेमाच्या सेटवर 'असा' वागायचा राजकुमार राव, म्हणाली...

"त्याने मला जेव्हा पाहिलं...", मराठी अभिनेत्रीसोबत हिंदी सिनेमाच्या सेटवर 'असा' वागायचा राजकुमार राव, म्हणाली...

Marathi Actress Reena Madhukar: हल्ली मराठी मनोरंजनविश्वातील बरेच कलाकार हे हिंदीसह दाक्षिणात्य सिनेविश्वातही आपली ओळख निर्माण करत आहेत. आपल्या अभिनयाची त्यांनी संपूर्ण जगाला दखल घ्यायला भाग पाडलं आहे. यावेळी इतर कलाकारांसोबत काम करताना त्यांना कसे अनुभव आले. सेटवर त्यांना कशी वागणूक मिळाली याबद्दल बरेच कलाकार सांगताना दिसतात. अशातच एका मराठी अभिनेत्री हिंदी चित्रपटात बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावसोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे.

दरम्यान, ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून रिना मधुकर आहे. 'मन उडू उडू झालं' मालिकेत सानिका नावाचं पात्र साकारून ती घराघरात लोकप्रिय झाली.अभिनयक्षेत्रात काम केल्यानंतर रीनानं निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं. अलिकडेच तिने राजश्री मराठीला मुलाखत दिली.या मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या अभिनय कारकि‍र्दीविषयी गप्पा मारल्या. दरम्यान, तिने एका हिंदी चित्रपटात राजकुमार रावसोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे. रीनाने तलाश तसेच बहन होगी या चित्रपटात राजकुमार रावसोबत काम केलं आहे. या मुलाखतीत बोलताना रीना म्हणाली, "आम्ही दोघांनी तलाशमध्ये एकत्र काम केलंय. तेव्हा तो नवीन होता. त्यादरम्यान, आम्ही दोघं एकत्र बसून गप्पा मारायचो. त्यावेळी जेव्हा आम्ही सगळे आमिर खान सरांबरोबर बसायचो तेव्हा तो त्यांना विचारायचा हा सीन तुम्ही कसा केला. शुट कसं केलं होतं."

मग पुढे अभिनेत्री म्हणाली," तलाशनंतर आम्ही बहन होगी तेरी मध्ये एकत्र काम केलं.तेव्हा मला सेटवर पाहून त्याला आनंद झाला होता. त्यानिमित्ताने आम्ही पुन्हा एकत्र जोडले गेलो. तो खूप चांगला माणूस आहे.त्याच्याकडून खूप काही गोष्टी शिकण्यासारखं आहे. तो कमालीचा कलाकार असल्यामुळे एखाद्या सीनमध्ये तो ज्या पद्धतीने छोट्या छोट्या जागा काढतो ते बघण्यासारखं आहे. रात्री-अपरात्री  जेव्हा त्याचं पॅकअप व्हायचं आणि समजा जर माझं शूटिंग सुरु असायचं तेव्हा तो थांबून क्यू देऊन जात असे."असं म्हणत अभिनेत्रीने राजकुमार रावबद्दल कौतुकोग्दार काढले.

दरम्यान,तलाश या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर, हा सिनेमा २०१७ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात  आमिर खान,  करीना कपूर, राणी मुखर्जी, नवाजुद्धीन सिद्धीकी तसेच राजकुमार राव अशी तगड्या कलाकारांची फळी होती. 

Web Title : मराठी अभिनेत्री ने राजकुमार राव के व्यवहार का खुलासा किया।

Web Summary : मराठी अभिनेत्री रीना मधुकर ने 'तलाश' और 'बहन होगी तेरी' में राजकुमार राव के साथ काम करने का अनुभव साझा किया। उन्होंने उनके सहायक स्वभाव और समर्पण की सराहना की, और यह भी बताया कि वह अपने दृश्यों के बाद भी मदद करने के लिए तैयार रहते थे।

Web Title : Rajkummar Rao's behavior on set revealed by Marathi actress.

Web Summary : Marathi actress Reena Madhukar shares her experience working with Rajkummar Rao in 'Talaash' and 'Behen Hogi Teri'. She praises his supportive nature and dedication to his craft, noting his willingness to assist even after his own scenes were completed.