'पुण्यश्लोक अहिल्याबाई' फेम अभिनेत्रीचा पार पडला साखरपुडा! कोण आहे होणारा नवरा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 08:55 IST2025-10-06T08:50:09+5:302025-10-06T08:55:57+5:30
टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्रीचा पार पडला साखरपुडा! कोण आहे होणारा नवरा?मालिकाविश्वाशी आहे खास कनेक्शन

'पुण्यश्लोक अहिल्याबाई' फेम अभिनेत्रीचा पार पडला साखरपुडा! कोण आहे होणारा नवरा?
Aetashaa Sansgiri: गेल्या काही महिन्यांमध्ये मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी मंडळींनी लग्नगाठी बांधल्या. तर काहींनी आपल्या नात्याची कबुली देत आपलं नातं जगजाहीर केलं. अशा बऱ्याच कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे त्यांच्या आयुष्यातील आनंदवार्ता चाहत्यांसोबत शेअर केली. अशातच मराठी टेलिव्हिजन विश्वातील एका लोकप्रिय अभिनेत्रीने तिच्या नवीन आयुष्याची सुरुवात करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. या नायिकेचं नाव एतशा संझगिरी आहे. नुकताच तिचा साखरपुडा पार पडला आहे.

'पुण्यश्लोक अहिल्याबाई' या मालिकेतून एतशा संझगिरी हे नाव घराघरात पोहोचलं. या ऐतिहासिक मालिकेतून तिने अल्पावधीतच रसिकांची पसंती मिळवली होती. दरम्यान, नुकताच कुटुंबीय आणि जवळचे मित्र-मैत्रिणी यांच्या उपस्थितीत एतशाचा साखरपुडा पार पडला. सोशल मीडियावर त्याचे फोटो समोर आले आहेत.एतिशाच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव निषाद भोईर आहे. निषाद आणि एतशा अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. लवकरच हे दोघे विवाह बंधनात अडकणार आहे.सध्या मराठी कलाविश्वातील सेलिब्रिटी मंडळी तसेच त्यांचे चाहते देखील या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.एतशा संझगिरीने साखरपुड्यात जांभळ्या रंगाची सिल्क साडी नेसली होती. या लूकमध्ये ती फारच सुंदर दिसत होती.
दरम्यान, एतशा संझगिरीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर 'छोटी मालकीण','निवेदिता माझी ताई', 'राजा राणीची गं जोडी' यांसारख्या मालिकांमध्ये झळकली आहे. तर निषाद भोईरने 'सावळ्याची जणू सावली', 'दख्खनचा राजा ज्योतिबा' या मालिकांमध्ये काम केलं आहे.