"आई-वडिलांनी सायकल दिली नाही म्हणून मुलाने जीवन संपवलं...", मराठी अभिनेत्रीने सांगितला हृदयद्रावक किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 17:25 IST2025-03-27T17:18:27+5:302025-03-27T17:25:54+5:30

स्वाती देवल ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री.

marathi television actress laxmi niwas fame swati dewal shared heartbreaking story in interview | "आई-वडिलांनी सायकल दिली नाही म्हणून मुलाने जीवन संपवलं...", मराठी अभिनेत्रीने सांगितला हृदयद्रावक किस्सा

"आई-वडिलांनी सायकल दिली नाही म्हणून मुलाने जीवन संपवलं...", मराठी अभिनेत्रीने सांगितला हृदयद्रावक किस्सा

Swati Deval: स्वाती देवल ( swati deval) ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेच्या माध्यमातून स्वाती देवल घराघरात पोहोचली. या मालिकेत तिने नेहाच्या (प्रार्थना बेहरे) वहिनीची भूमिका साकारली होती. ग्रे शेड असलेली ही भूमिका प्रेक्षकांना विशेष भावली. सध्या अभिनेत्री लक्ष्मी निवास मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आली आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये स्वाती देवल आणि तिचा नवरा तुषारने मुलांच्या संगोपनावर भाष्य केलं आहे. 

'मराठी मनोरंजन विश्व' या यूट्यूब चॅनलसोबत संवाद साधला. त्यादरम्यान स्वाती देवल म्हणाली, "माझं नेहमीच असं म्हणणं असतं की आपलं बालपण काही वाईट गेलेलं नाही. म्हणजे आपल्या आई-वडिलांनी आपलं कौतुक केलं नाही, वाटेल तसं मारलं, भांडले त्यामुळे आपलं आयुष्य वाईट नाही ना गेलं. आपण त्या सगळ्यातून गेलो आहोत. पण, आपण मुलांना इतकी मोकळीक का देतोय? किंवा त्यांना नकार पचवण्याची सवयच लावत नाही. याच मुद्यावर बोलताना अभिनेत्रीचा पती तुषार म्हणाला, "खरंतर हीच अडचण आहे कोणीही असो मुलगा किंवा मुलगी त्यांना आता नकार नको आहे."

त्यानंतर एका घटनेचा दाखला देत अभिनेत्री म्हणाली, "आमच्याकडे माझ्या एरियामध्ये एका मुलाला आई-वडिलांनी सायकल देणार नाही असं सांगितलं. म्हणून त्या मुलाने आत्महत्या  केली. आठवीत शिकणारा तो मुलगा होता. मला असं म्हणायचं आहे की का? तुम्ही नकार का पचवू शकत नाही. मुलांना परिस्थितीची जाणीव करून देणं गरजेचं आहे. मुलांना राग आला किंवा वाईट वाटलं तर रुसू द्या. रागावू द्या. चिडू द्या. भांडू द्या. मुलांनी व्यक्त होणं गरजेचं आहे. पण, मुलांनाही या अॅडजस्टमेंटची सवय लागली पाहिजे." असं अभिनेत्रीने सांगितलं. 

Web Title: marathi television actress laxmi niwas fame swati dewal shared heartbreaking story in interview

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.