हळद लागली! 'सहकुटुंब सहपरिवार' फेम अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात, कोण आहे होणारा नवरा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 14:44 IST2025-11-25T14:43:08+5:302025-11-25T14:44:43+5:30
हळद लागली! 'सहकुटुंब सहपरिवार' मालिकेतील 'ही' अभिनेत्री लवकरच बांधणार लग्नगाठ, होणाऱ्या नवऱ्याचं मनोरंजन विश्वाशी आहे कनेक्शन

हळद लागली! 'सहकुटुंब सहपरिवार' फेम अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात, कोण आहे होणारा नवरा?
Komal Kumbhar: मराठी कलाविश्वात सध्या लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. इंडस्ट्रीतील अनेक कलाकार येत्या काही दिवसात लग्नबंधनात अडकणार आहेत. अलिकडेच लक्ष्मी निवास मालिकेतील जयंत म्हणजे अभिनेता मेघन जाधवचं लग्नबंधनात अडकला. तर येत्या काही दिवसांत प्राजक्ता गायकवाड, एतिशा सांझगिरी हे कलाकार लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यानंतर मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री लग्नबंधनात अडकण्यासाठी सज्ज आहे. ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून कोमल कुंभार आहे. आता कोमलच्या घरी लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे.
'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेतून कोमल कुंभार ही घराघरात पोहोचली. या मालिकेत तिने साकारलेली अंजली प्रेक्षकांना प्रचंड भावली. शिवाय अलिकडेच ती 'अबोली' मालिकेतही पाहायला मिळाली. अशातच नुकताच पारंपारिक पद्धतीने रितीरिवाजानूसार कोमलचा हळदी सोहळा पार पडला. त्याचे फोटो, व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.आता लवकरच अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार आहे. कोमलच्या हळदीच्या कार्यक्रमाला कुटुंब आणि मित्रमंडळींनी उपस्थित लावली आहे.
कोण आहे होणारा नवरा?
अभिनेत्री कोमल कुंभारच्या या हळदीच्या व्हिडीओमध्ये तिच्या होणाऱ्या नवऱ्याची झलक पाहायला मिळते आहे. तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव गोकुल दशवंत असं आहे. गोकुल गेली अनेक वर्ष इंडस्ट्रीत सक्रिय आहे. गोकुळ दशवंत हे कलाविश्वात अभिनेता, लेखक, दिग्दर्शक म्हणून काम करत असल्याची माहिती मिळते आहे.