"एका आठवड्यात १६ ऑडिशनमध्ये रिजेक्ट झाले अन्...",'सुंदरा मनामध्ये भरली' मधील लतिकाने सांगितला संघर्षकाळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 16:34 IST2026-02-20T16:29:59+5:302026-02-20T16:34:24+5:30

"एकाच आठवड्यात १६ ऑडिशनमध्ये रिजेक्ट झाले,नंतर...", अक्षया नाईकचं कठीण काळावर भाष्य 

marathi television actress akshaya naik talk about difficult phase in her life | "एका आठवड्यात १६ ऑडिशनमध्ये रिजेक्ट झाले अन्...",'सुंदरा मनामध्ये भरली' मधील लतिकाने सांगितला संघर्षकाळ 

"एका आठवड्यात १६ ऑडिशनमध्ये रिजेक्ट झाले अन्...",'सुंदरा मनामध्ये भरली' मधील लतिकाने सांगितला संघर्षकाळ 

Akshaya Naik: प्रेक्षकांची लाडकी सुंदरा म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे अक्षया नाईक. अक्षयाने आजवर मराठीसह हिंदी मालिकाविश्वातही तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. मात्र, आजही ती सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेमुळे चाहत्यांच्या लक्षात आहे. या मालिकेत तिने साकारलेल्या लतिका नावाच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. सध्या अक्षया एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. यादरम्यान, तिने आयुष्यातील कठीण काळावल भाष्य केलं.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

नुकतीच अक्षया नाईकने 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये अभिनेत्री आयुष्यातील कठीण प्रसंगांविषयी बोलताना म्हणाली, "२०२४ हे वर्ष हे माझ्यासाठी थोडं अवघड गेलं. कारण, २०२३ ला माझी मालिका संपली त्यानंतर नाटक चालू होतं. तेव्हा मी कामात खूप व्यस्त होते. तीन-एक वर्ष मालिका करत तेव्हा आपलं एक रुटिन सेट झालेलं असतं. इतर कोणत्याही गोष्टीचा स्ट्रेस नसतो. कारण,आपल्याला माहित असतं महिन्याचा शेवटी एक ठराविक रक्कम मिळणार आहे. आपल्याकडे काम आहे. त्यानंतर मग मालिका संपली आणि नाटकाचे प्रयोग कमी झाले. अचानक असं झालं की माझ्याकडे काहीच काम नव्हतं. मग काय करावं, काय नाही... असा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला. त्यात सहा महिने माझं असं होतं की एक नाटक चालू आहे तर कशाला १० ठिकाणी बघतोय."

एकाच आठवड्यात १६ रिजेक्शन आले अन्...

यानंतर अक्षया म्हणाली,"मला आठवतंय त्यानंतर एका आठवड्यात मी १६ ऑडिशन्स दिल्या. आणि माझं त्यातील एकाही माझं प्रोजेक्टमध्ये सिलेक्शन झालं नाही. एकाच आठवड्यात १६ रिजेक्शन आल्यानंतर मी काय करावं, काय नाही असा तो काळ होता. त्याच काळात घरी पण इतर काही गोष्टी सुरु होत्या. हेल्थ इश्यू होते. काही आर्थिक अडचणी होत्या. एकाच वेळी सगळ्या अडचणी येतात... असं काहीसं आमच्यासोबत घडलं. मग त्यानंतर बऱ्याच गोष्टी बदलल्या."

अक्षया नाईकने मराठीबरोबरच हिंदी टेलिव्हिजनचा पडदादेखील गाजवला आहे. अक्षयाने हिंदीतील लोकप्रिय मालिका 'ये रिश्ता क्या कहलाता है' मध्येही भूमिका साकारली होती.सध्या ती 'तस्करी : द स्मगलर्स वेब' या सीरिजमुळे चर्चेत आहे. यामध्ये तिने इमरान हाश्मीसोबत स्क्रिन शेअर केली. 

Web Title : अक्षया नाइक को एक सप्ताह में 16 बार अस्वीकृति मिली: संघर्ष का खुलासा।

Web Summary : 'सुंदरा मनामध्ये भरली' के लिए जानी जाने वाली अक्षया नाइक ने अपनी सीरीज खत्म होने के बाद संघर्ष के दिनों का खुलासा किया। उन्हें वित्तीय और स्वास्थ्य समस्याओं के बीच एक सप्ताह में 16 बार अस्वीकृति का सामना करना पड़ा। अब वह 'तस्करी' में हैं।

Web Title : Akshaya Naik faced 16 rejections in a week: Struggle revealed.

Web Summary : Akshaya Naik, known for 'Sundara Manamadhye Bharli,' revealed struggling times after her series ended. She faced 16 rejections in a week amid financial and health issues. She now stars in 'Taskari'.