"सुंदर ते ध्यान उभे विटेवरी...", मधुराणी प्रभुलकर विठुरायाच्या चरणी नतमस्तक; मनोभावे घेतलं दर्शन 

By सुजित शिर्के | Updated: March 6, 2025 11:06 IST2025-03-06T11:03:33+5:302025-03-06T11:06:30+5:30

"सुंदर ते ध्यान उभे विटेवरी...", 'आई कुठे...' फेम मधुराणी प्रभुलकरने घेतलं पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन

marathi television actress aai kuthe kay karte fame madhurani prabhulkar seek blessings at pandharpur vitthal rukmini temple shared post | "सुंदर ते ध्यान उभे विटेवरी...", मधुराणी प्रभुलकर विठुरायाच्या चरणी नतमस्तक; मनोभावे घेतलं दर्शन 

"सुंदर ते ध्यान उभे विटेवरी...", मधुराणी प्रभुलकर विठुरायाच्या चरणी नतमस्तक; मनोभावे घेतलं दर्शन 

Madhurani Prabhulkar:मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) हे नाव मराठी मालिकाविश्वातील नावाजलेलं नाव आहे. 'आई कुठे काय करते' या लोकप्रिय मालिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली. जवळपास ५ वर्षे  'आई कुठे...' च्या माध्यमातून तिने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. या मालिकेत अरुंधती हे पात्र साकारुन ती घराघरात पोहोचली. अगदी काही महिन्यांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. तरी त्यातील कलाकार कायम चर्चेत राहतात. अशातच अभिनेत्रीने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट चाहत्यांचं लक्ष वेधून घेताना दिसत आहे. 


नुकतंच मधुराणी प्रभुलकरनेपंढरपूरात जाऊन विठ्ठल-रखुमाईचं दर्शन घेतलं. याशिवाय मधुराणीने सोशल मीडियावर विठ्ठलाच्या गाभाऱ्यातील काही खास फोटो सुद्धा शेअर केले आहेत. दरम्यान, अभिनेत्रीने हे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय, "सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवोनिया...! अखेर दर्शन घडलं..., अगदी शांत आणि निवांत…. ही त्याचीच योजना…। अक्षरशः डोळ्याचं पारणं फिटलं… मन भरून आणि भारून गेलं… गदगदून रडू फुटेल की काय असंच झालं…! आतून शांत शांत करत गेलं. विठ्ठल विठ्ठल..!" अभिनेत्रीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

मधुराणी प्रभुलकरच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, 'आई कुठे काय करते' या मालिकेव्यतिरिक्त मराठी चित्रपट तसेच नाटकांमध्येही तिने काम केलं आहे.  मुधराणी सध्या "आई कुठे...", मालिकेनंतर रंगभूमीवर 'ज्याचा त्याचा विठ्ठल' हा एक आगळावेगळा प्रयोग करताना दिसते आहे. 

Web Title: marathi television actress aai kuthe kay karte fame madhurani prabhulkar seek blessings at pandharpur vitthal rukmini temple shared post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.