ठरलं! 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीने सोशल मीडियावर दिली प्रेमाची कबुली, कोण आहे होणारा नवरा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 11:01 IST2026-02-03T10:55:23+5:302026-02-03T11:01:19+5:30
'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीने नातं जगजाहीर केलं, सोशल मीडियावर दिली प्रेमाची कबुली, म्हणाली...

ठरलं! 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीने सोशल मीडियावर दिली प्रेमाची कबुली, कोण आहे होणारा नवरा?
Television Actress Apurva Gore: मनोरंजन विश्वातील कलाकारांबद्दल जाणून घेण्यास प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता असते. हल्ली सोशल मीडियामुळे कलाकार आणि चाहत्यांमध्ये एक दुवा निर्माण झाला आहे. त्यामुळे कलाकारांबद्दल प्रत्येक अपडेट चाहत्यांना सहज मिळते. अशातच मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार गेल्या काही महिन्यांमध्ये लग्नबंधनात अडकले. तर काहींनी अगदी जाहीरपणे प्रेमाची कबुली दिली.आता या यादीमध्ये आणखी एका अभिनेत्रीचं नाव सामील झालं आहे. कोण आहे ही अभिनेत्री? जाणून घ्या...
अलिकडेच विशाल निकम, ज्ञानदा रामतीर्थकर, गायत्री दातार, रेवती लेले या कलाकारांपाठोपाठ आणखी एका अभिनेत्रीने तिच्या प्रेमाची जाहीरपणे कबुली दिली आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अपूर्वा गोरे आहे.‘स्टार प्रवाह’च्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत ईशा नावाची भूमिका साकारणारी लोकप्रिय अभिनेत्री अपूर्वा गोरे लवकरच बोहल्यावर चढणार आहे. एका हातात गुलाबाचं फुल आणि जोडीदाराचा पाठमोरा असलेला फोटो शेअर करत तिने सोशल मीडियावर प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे.
अपूर्वा गोरेने शेअर केलेल्या आणखी एका फोटोमध्ये तिच्या होणाऱ्या नवऱ्याची झलक पाहायला मिळत आहे. मात्र, अभिनेत्रीने अद्याप तिचा पती नेमका कोण आहे? त्याचं नाव काय आहे? याबद्दल सोशल मीडियावर कोणताही खुलासा केलेला नाही. आता अपूर्वा होणाऱ्या नवऱ्याचा फेस रिव्हिल केव्हा करणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.