‘आमचं पितळ उघडं पाडतो आहेस रे...’, Shashank Ketkarनं शेअर केला सेटवरचा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2022 17:44 IST2022-05-08T17:44:03+5:302022-05-08T17:44:26+5:30
Shashank Ketkar Video : ‘डायरेक्टरचा आवाज ऐकू येईल तुम्हाला- आमचं पितळ उघडं पाडतो आहेस रे...,’असं कॅप्शन देत शशांकनं हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत काय आहे, हे बघण्यासाठी तुम्हाला बातमीसोबत दिलेला व्हिडीओ बघावा लागेल.

‘आमचं पितळ उघडं पाडतो आहेस रे...’, Shashank Ketkarनं शेअर केला सेटवरचा व्हिडीओ
Shashank Ketkar Video : होणार सून मी ह्या घरची आणि पाहिले न मी तुला यांसारख्या मालिकांमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar) सध्या ‘मुरांबा’ या मालिकेत दिसतोय. तूर्तास याच मालिकेवरचा शशांकने शेअर केलेला एक व्हिडीओ वाऱ्याच्या वेगानं व्हायरल होतोय. ‘डायरेक्टरचा आवाज ऐकू येईल तुम्हाला- आमचं पितळ उघडं पाडतो आहेस रे...,’असं कॅप्शन देत शशांकनं हा मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत काय आहे, हे बघण्यासाठी तुम्हाला बातमीसोबत दिलेला अख्खा व्हिडीओ बघावा लागेल.
अभिनेता असण्याचे फायदे... शूटींग लोकेशनवर देखील तुम्हाला काय खायला मिळत बघा..असं शशांक या व्हिडीओत म्हणतो आणि खाण्याच्या टेबलाकडं वळतो. खाण्याच्या या टेबलावर अनेक पदार्थाची भांडी ठेवलेली दिसतात. त्याखाली मेन्यूचं नाव दिसतो. यानंतर शशांक प्रत्येक भांड्याचं झाकणं काढून दाखवतो. मात्र बहुतेक भांडी रिकामी असतात. त्यात काहीच नसतं... त्याचा व्हिडिओ सुरू असतानाचा दिग्दर्शकाचा मागून आवाज येतो... अरे कशाला आमचं पितळ उघडं पाडतो आहेस?
शशांकच्या या भन्नाट व्हिडिओवर चाहत्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.. आपण फक्त सेटवर नाचो..., असं एकानं म्हटलं आहे. तर की,राहू दे रे दादा संपला असेल...असं दुसऱ्यानं लिहिलं आहे.
हा व्हिडीओ गमतीचा भाग आहे, हे तर तुम्हाला कळलं असेलच. कारण शशांक कधीच सेटवरच जेवण खात नाही, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. सेटवर तो घरचा डबा खातो. विशेष म्हणजे, हे जेवण तो स्वत: बनवतो. जेवण बनवण्याचा त्याला कधीच कंटाळा येत नाही.