ये बात! प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्याचं टीव्हीवर दमदार कमबॅक,'या' मालिकेत साकारणार भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 18:24 IST2026-03-01T18:22:00+5:302026-03-01T18:24:07+5:30
छोट्या पडद्यावर येतेय नवी मालिका!'हा' लोकप्रिय अभिनेता मुख्य भूमिकेत, नायिका कोण?

ये बात! प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्याचं टीव्हीवर दमदार कमबॅक,'या' मालिकेत साकारणार भूमिका
Television: सध्या मराठी मालिकाविश्वात नव्या मालिकांची मांदियाळी पाहायला मिळतेय. एकापेक्षा एक सरस आणि नवनवीन विषयांवर आधारित मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.अशातच नुकताच कलर्स मराठी वाहिनीने आगामी मी जिंकून घेईन सारं या मालिकेचा प्रोमो आणि प्रसारणाची तारीख जाहीर केली आहे. त्यापाठोपाठ आता वाहिनीकडून नव्या मालिकेची घोषणा केली आहे. सध्या प्रोमो मालिका रसिकांमध्ये चर्चेचा विषय ठरलाय. याचं कारण म्हणजे टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेता यामधून कमबॅक करतोय. तर कोण आहे हा अभिनेता जाणून घेऊया...
कलर्स मराठीच्या या आगामी मालिकेचं नाव 'मोहिनी' असं आहे. नुकताच सोशल मीडियावर या मालिकेचा प्रोमो समोर आला आहे. त्यामुळे मालिकेत मुख्य भूमिका कोण साकारणार असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. हे चित्र आता स्पष्ट झालं नाही. मोहिनी या मालिकेच्या नावानुसार त्यामध्ये मोहिनीची भूमिका ही अभिनेत्री अनघा ठाकूर आहे. तर अनघाच्या सोबतीला टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा असलेला अभिनेता समीर परांजपे मुख्य भूमिकेत झळकणार आहे." मोहिनीचा स्वाभिमान विरुद्ध RK चा अहंकार.... सेटवर सुरु झालेली ही कथा जेव्हा खऱ्या आयुष्याच्या पडद्यावर उतरणार, तेव्हा काय घडणार?" असं कॅप्शन देत कलर्स मराठीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर या प्रोमोची झलक शेअर करण्यात आली आहे. त्यामुळे चाहते देखील उत्सुक झाले आहेत.
समीर परांजपेचं हे कमबॅक पाहून चाहते प्रचंड आनंदी झाले आहेत. दरम्यान, समीरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो 'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेमुळे घराघरात पोहोचला. त्यानंतर समीर 'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिकेत दिसला. आता तो नव्या भूमिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे.