दणक्यात पार पडलं मराठमोळ्या अभिनेत्याच्या लेकाचं बारसं; हटके नावांच्या ट्रेंडमध्ये ठेवलंय 'हे' नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 10:12 IST2026-04-04T10:05:33+5:302026-04-04T10:12:15+5:30

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्याला पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे.नुकताच अभिनेत्याच्या लेकाचा नामकरण सोहळा पार पडला आहे.

marathi television actor sadhi mansa serial fame akash nalawade and ruchika dhuri son naming ceremony | दणक्यात पार पडलं मराठमोळ्या अभिनेत्याच्या लेकाचं बारसं; हटके नावांच्या ट्रेंडमध्ये ठेवलंय 'हे' नाव

दणक्यात पार पडलं मराठमोळ्या अभिनेत्याच्या लेकाचं बारसं; हटके नावांच्या ट्रेंडमध्ये ठेवलंय 'हे' नाव

Akash Nalawade: छोट्या पडद्यावरील 'साधी माणसं' ही मालिका लोकप्रिय असणाऱ्या मालिकांपैकी होती.अगदी काही दिवसांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. साधी माणसं या मालिकेत सत्या नावाचं पात्र साकारून त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेतली त्याची आणि मीरा म्हणजेच शिवानी बावकरची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली. दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच आकाश नलावडे व त्याची पत्नी रुचिका धुरी यांच्या आयुष्यात एक छोटा पाहुणा आला. अशातच आता अभिनेत्याच्या लेकाचा नामकरण सोहळा देखील मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याचे काही क्षण त्यांनी चाहत्यांसोबतही शेअर केले आहेत. 

आकाश नलावडेच्या पत्नीचं नाव रुचिका धुरी असं आहे. २०२३ मध्ये त्यांनी लग्न केलं. लग्नानंतर  २ वर्षांनी त्यांच्या छोट्या राजकुमाराचं आगमन झालं आहे.  काल ३ मार्च २०२६ रोजी त्यांनी आपल्या मुलाचं बारसं केलं आहे. त्याचा एक व्हिडिओदेखील त्यांनी चाहत्यांसोबत शेअर केला आहे. यात मुलाच्या नावाचा बोर्ड उघडताना दिसतायत. 'इट्स मज्जाच्या सोशल मीडिया अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. आकाश आणि रुचिका यांनी त्यांच्या मुलाचं नाव अधिराज असं गोड नाव ठेवलं आहे. चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. नेटकरी आकाश आणि रुचिकाला शुभेच्छा देत आहेत. सोबतच त्यांच्या चिमुकल्या अधिराजला सुदृढ आयुष्यासाठी आशीर्वाद देत आहेत.

नावाचा अर्थ आहे खूपच खास...

अधिराज या नावाचा अर्थ आहे- अधिराज नावाची व्यक्ती परमानंदाचे प्रतीक आहे. सामर्थ्य, वर्चस्व आणि नेतृत्वाचे प्रतीक मानले जाते.

दरम्यान, आकाश नलावडेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर सहकुटुंब सहपरिवार या मालिकेमुळे तो घराघरात पोहोचला. या मालिकेत पश्या नावाच्या भूमिकेने त्याला खरी लोकप्रियता मिळवून दिली. अलिकडेच तो साधी माणसं  मालिकेत पाहायला मिळाला. सध्या बाबा झाल्याने आकाश प्रचंड आनंदी असल्याचा पाहायला मिळतोय. 

Web Title : मराठी अभिनेता के बेटे का नामकरण समारोह धूमधाम से; अनोखा नाम 'अधिराज' रखा।

Web Summary : अभिनेता आकाश नलावडे और पत्नी रुचिका धुरी ने अपने बेटे अधिराज का नामकरण समारोह मनाया। दंपति ने प्रशंसकों के साथ खुशी का अवसर साझा किया। अधिराज का अर्थ है परम आनंद, शक्ति और नेतृत्व।

Web Title : Marathi actor's son's naming ceremony celebrated; unique name 'Adhiraj' chosen.

Web Summary : Actor Akash Nalawade and wife Ruchika Dhuri celebrated their son Adhiraj's naming ceremony. The couple shared the joyous occasion with fans. Adhiraj means ultimate bliss, strength, and leadership.