तारीख ठरली! मराठी कलाविश्वातील 'हा' लोकप्रिय अभिनेता लवकरच अडकणार विवाहबंधनात, लग्नपत्रिका पाहिलीत का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 13:55 IST2025-11-18T13:47:42+5:302025-11-18T13:55:10+5:30
लग्नाची तारीख ठरली! मराठी अभिनेत्याची लगीनघाई, थाटात पार पडलं केळवण

तारीख ठरली! मराठी कलाविश्वातील 'हा' लोकप्रिय अभिनेता लवकरच अडकणार विवाहबंधनात, लग्नपत्रिका पाहिलीत का?
Celebrity Wedding: सध्या सगळीकडे लगीनसराईचा माहोल आहे. अनेकजण आता विवाहबंधनात अडकत आहेत. सेलिब्रिटीही त्याला अपवाद नाही. येत्या काही दिवसांमध्ये मराठीसह हिंदी कलाविश्वातील बरेच कलाकार लग्नबंधनात अडकणार आहेत. प्राजक्ता गायकवाड, शिवानी नाईक आणि एतिशा सांझगिरी हे कलाकार लवकरच बोहोल्यालवर चढणार आहेत. त्यानंतर मालिकाविश्वातील आणखी एक अभिनेता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.नुकतंच अभिनेत्याचं केळवण पार पडलं आहे.

'लाखात एक आमचा दादा' मालिकेतील अभिनेता शुभम पाटील लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. अगदी अलिकडेच जून महिन्यात शुभमने त्याची गर्लफ्रेंड संमती पाटील हिच्याशी साखरपुडा केला होता. जवळपास ५ महिन्यानंतर आता हे दोघेही लग्न करणार आहेत. येत्या २५ नोव्हेंबरला हा अभिनेता लग्नबंधनात अडकणार आहे. शुभमने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर त्याची लग्नपत्रिका शेअर करत लग्नाची तारीख रिव्हिल केली आहे.

वर्कफ्रंट
शुभम पाटील याने लाखात एक आमचा दादा मालिकेत जिमसिनाची भूमिका साकारली होती. याअगोदर तो झी मराठीच्या तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं मालिकेत झळकला होता. मूळचा सांगलीचा असलेल्या शुभम पाटीलला फिटनेसची आवड आहे. यातूनच त्याला अभिनय क्षेत्रात येण्याची संधी मिळाली.