नांदा सौख्यभरे! मालिकाविश्वातील 'हा' लोकप्रिय अभिनेता अडकला विवाहबंधनात, लग्नाला कलाकारांची मांदियाळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 12:16 IST2025-11-26T12:10:22+5:302025-11-26T12:16:49+5:30
'लाखात एक आमचा दादा' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात, लग्नाला कलाकारांची मांदियाळी

नांदा सौख्यभरे! मालिकाविश्वातील 'हा' लोकप्रिय अभिनेता अडकला विवाहबंधनात, लग्नाला कलाकारांची मांदियाळी
Shubham Patil: यंदाच्या वर्षात मराठी कलाविश्वातील बरेच कलाकार लग्नबंधनात अडकणार आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री शिवानी नाईक तसेच प्राजक्ता गायकवाड यांचा साखरपुडा थाटामाटात पार पडला. यापाठोपाठ आता मराठी मनोरंजनविश्वातील आणखी एका अभिनेत्याने लग्नाबद्दलची आनंदाची बातमी देत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. लाखात एक आमचा दादा मालिकेत झळकलेला हा अभिनेता नुकताच लग्नबंधनात अडकला आहे.

लाखात एक आमचा दादा मालिकेत झळकलेला अभिनेता शुभम पाटील नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. जून महिन्यात शुभमने त्याची गर्लफ्रेंड संमती पाटील हिच्याशी साखरपुडा केला होता. जवळपास ५ महिन्यानंतर आता या दोघांनीही लग्नगाठ बांधली आहे. त्यांच्या लग्नसोहळ्यातील सुंदर फोटो शुभमचे मित्रमंडळी आणि जवळच्या कुटुंबीयांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.या लग्नाला मराठी सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
वर्कफ्रंट
शुभम पाटील याने 'लाखात एक आमचा दादा' मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसला. या मालिकेत त्याने जिमसिना नावाची भूमिका साकारली होती. यापूर्वी शुभम 'तुझ्या माझ्या संसाराला' आणि काय हवं मालिकेत झळकला होता. मूळचा सांगलीचा असलेल्या शुभम पाटीलला फिटनेसची प्रचंड आवड आहे.