'लागीरं झालं जी' मालिकेतील अभिनेत्याने दिली गुडन्यूज, घरी आली नवी पाहुणी, म्हणाला-"तुम्हा सगळ्यांना..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 09:03 IST2026-03-20T08:58:58+5:302026-03-20T09:03:40+5:30

'लागीरं झालं जी' मधील विक्याची स्वप्नपूर्ती! अभिनेत्याने खरेदी केली ड्रीम कार, चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

marathi television actor lagira jhala ji serial fame nikhil chavan buy new car share first glimpse with fans | 'लागीरं झालं जी' मालिकेतील अभिनेत्याने दिली गुडन्यूज, घरी आली नवी पाहुणी, म्हणाला-"तुम्हा सगळ्यांना..."

'लागीरं झालं जी' मालिकेतील अभिनेत्याने दिली गुडन्यूज, घरी आली नवी पाहुणी, म्हणाला-"तुम्हा सगळ्यांना..."

Nikhil Chavan Buy New Car: गुढीपाडवा हा चैतन्याचा मांगल्याचा सण आहे.गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणून साजरा केला जातो तो संस्कार नवचैतन्य आणि सकारात्मकतेचा प्रतीक मानला जातो. प्रत्येक वर्षी येणारा हा सण आपल्याला नव्याने सुरुवात करण्याची प्रेरणा देतो. काल संपू्र्ण महाराष्ट्रात हा सण मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा झाला.या शुभदिनी मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी  नव्या घरात गृहप्रवेश केला. तर काहींनी नवीन गाडी खरेदी करत चाहत्यांना सुखद धक्का दिला.

अशातच मराठी कलाविश्वातील एका लोकप्रिय अभिनेत्याने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे.गुढीपाडव्याचं औचित्य साधून या अभिनेत्याने नवीकोरी गाडी खरेदी करून त्याचं स्वप्न साकार केलं आहे. हा अभिनेता  म्हणजे निखिल चव्हाण आहे.


'लागीरं झालं जी' या मालिकेत विक्रम राऊत म्हणजेच विक्याची भूमिका साकारून निखिल चव्हाण महाराष्ट्रातील घराघरात पोहोचला. या मालिकेतील त्याच्या कामाने तो आजही चाहत्यांच्या लक्षात आहे. लागीरं झालं जी मालिकेनंतर निखिल कायभारी लयभारी मालिकेतही दिसला. त्याचबरोबर विविध मालिका, चित्रपटांमधून त्याने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. काल गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर प्रेक्षकांच्या या लाडक्या अभिनेत्याने त्याची ड्रीम कार खरेदी केली आहे. निखिलाने 'Tata Harrier' ही गाडी घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या गाडीची मार्केटव्हल्यू  १५ ते २४ लाख इतकी आहे. 

"नवीन वर्षाची नवीन सुरुवात...तुम्हा सगळ्यांना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...गणपती बाप्पा मोरया...", असं सुंदर कॅप्शन देत अभिनेत्याने नवीन गाडी खरेदी केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.  निखिलच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्स करत त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. 

Web Title : 'लागिरं झालं जी' फेम निखिल चव्हाण ने गुड़ी पड़वा पर खरीदी नई कार

Web Summary : 'लागिरं झालं जी' से मशहूर निखिल चव्हाण ने गुड़ी पड़वा के अवसर पर नई टाटा हैरियर कार खरीदी। उन्होंने सोशल मीडिया पर यह खबर साझा की, जिसके बाद प्रशंसकों ने उन्हें बधाई दी। कार की बाजार कीमत लगभग 15 से 24 लाख है।

Web Title : 'Lagira Zhala Ji' actor Nikhil Chavan buys new car on Gudi Padwa

Web Summary : Nikhil Chavan, known for 'Lagira Zhala Ji,' celebrated Gudi Padwa by purchasing a new Tata Harrier car. He shared the news on social media, receiving congratulations from fans. The car's market value is approximately 15 to 24 lakh.