बाप्पा पावला! गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर मराठी जोडप्याचा नव्या घरात गृहप्रवेश, दारावरील नेमप्लेट ठरतेय लक्षवेधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 09:13 IST2025-08-28T09:08:19+5:302025-08-28T09:13:54+5:30

गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर मराठी जोडप्याचा नव्या घरात गृहप्रवेश, फोटो शेअर करत लिहिली सुंदर पोस्ट

marathi television actor guru divekar and her wife actress madhura joshi moves into new house on ganesh chaturthi nameplate on door is eye catching post viral | बाप्पा पावला! गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर मराठी जोडप्याचा नव्या घरात गृहप्रवेश, दारावरील नेमप्लेट ठरतेय लक्षवेधी

बाप्पा पावला! गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर मराठी जोडप्याचा नव्या घरात गृहप्रवेश, दारावरील नेमप्लेट ठरतेय लक्षवेधी

Marathi Celebity Couple New House: अभिनेत्री मधुरा जोशी आणि गुरु ठाकूर हे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय असणारं जोडपं आहे. गुरु दिवेकर हा मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेता असून त्याने अनेक मालिकामधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. तर त्याची पत्नी मधुरा जोशीसुद्धा काही मराठी मालिकाविश्वात सक्रिय आहे. सध्या हे जोडपं एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलं आहे. नुकतीच या कपलने त्यांच्या एक गुडन्यूज शेअर केली आहे. काही दिवसांपूर्वी दोघांनी मिळून त्यांच्या नव्या घराचं स्वप्न साकार केलं. गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर मधुरा आणि गुरुने नव्या घरात गृहप्रवेश करत चाहत्यांना खास सरप्राईज दिलं आहे. 


नुकतीच मधुरा जोशीने आणि गुरू दिवेकरने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट शेअर केली आहे. या जोडप्याने नवं घर घेतलं असून गणेश चतु्र्थीच्या निमित्ताने घराची खास झलक देखील चाहत्यांना दाखवली आहे. सध्या सोशल मीडयावर या लोकप्रिय जोडप्याच्या घराचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत."पहिल घर , नवीन घरातला “पहिला बाप्पा”,वारकरी आले आमच्या घरी...", असं सुंदर कॅप्शन देत त्यांनी या पोस्टला दिलं आहे.  यावरुन त्यांनी नवीन घर घेतल्याचं स्पष्ट होतंय.  मधुरा-गुरु यांच्या घराची नेमप्लेट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. 

दरम्यान, मधुरा आणि गुरु दिवेकरच्या नव्या घराची पोस्ट पाहून त्यावर मराठी कलाकारांसह नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. गिरीजा प्रभू, अभिजीत आमकर, ऐश्वर्या नारकर तसेच रेवती लेले यांसारख्या असंख्य सेलिब्रिटींनी या जोडप्याचं नव्या घरासाठी कौतुक केलं आहे. 

वर्कफ्रंट

मधुरा जोशीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर 'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेत ईमली हे पात्र साकारून ती घराघरात पोहोचली. सध्या ही अभिनेत्री 'तू ही रे माझा मितवा' मालिकेत काम करताना दिसते आहे. याशिवाय गुरु दिवेकरनेही अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या 'सावळ्याची जणू सावली' मालिकेत तो सोहम हे पात्र साकारत आहे. 

Web Title: marathi television actor guru divekar and her wife actress madhura joshi moves into new house on ganesh chaturthi nameplate on door is eye catching post viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.