तुझेच मी गीत गात आहे: होईल का मल्हार आणि स्वराची भेट...?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 15:06 IST2022-06-27T15:05:29+5:302022-06-27T15:06:13+5:30

Tuzech me geet gaat ahe: वैदेहीचा मृत्यू झाल्यामुळे स्वरा तिच्या बाबांना शोधायला निघाली आहे. मात्र, या भेटीमध्येही अनेक अडथळे येत असल्याचं पाहायला मिळत आहे.

marathi serial tuzech me geet gaat ahe swara and malhar Visit | तुझेच मी गीत गात आहे: होईल का मल्हार आणि स्वराची भेट...?

तुझेच मी गीत गात आहे: होईल का मल्हार आणि स्वराची भेट...?

काही दिवसांपूर्वीच छोट्या पडद्यावर  सुरु झालेली 'तुझेच मी गीत गात आहे' ही नवीन मालिका प्रेक्षकांचं मन जिंकण्यास यशस्वी ठरली आहे. अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या या मालिकेत अभिनेता अभिजीत खांडकेकर (abhijeet khandkekar) आणि उर्मिला कोठारे (urmila kothare)  मुख्य भूमिका साकारत आहेत. सध्या या मालिकेत एक मोठा ट्विस्ट आला आहे. वैदेहीचा मृत्यू झाल्यामुळे स्वरा तिच्या बाबांना शोधायला निघाली आहे. विशेष म्हणजे स्वरा आणि मल्हारची भेट होणार आहे. मात्र, या भेटीमध्येही अनेक अडथळे येत असल्याचं पाहायला मिळत आहे.

स्टार प्रवाहने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये स्वरा आणि मल्हार यांची भेट होता होता राहणार आहे.  वैदेहीच्या मृत्यूनंतर स्वरा तिच्या वडिलांना शोधण्यासाठी मुंबई गाठते. आणि, आपल्या बाबांचा शोध घ्यायला निघते. 

दरम्यान, मल्हारला शोधायला निघालेल्या स्वराने स्वराज हे नवं रुप धारण केलं आहे. त्यामुळे सध्या ती स्वराज म्हणून मुलाच्या वेशात वावरत आहे. विशेष म्हणजे स्वरा मल्हारपासून अगदी जवळ आहे. मात्र, सातत्याने या बाप-लेकीची भेट चुकत आहे. त्यामुळे आता या मालिकेत कोणता ट्विस्ट येणार? स्वरा आणि मल्हारची भेट होणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावर मिळणार आहेत.
 

Web Title: marathi serial tuzech me geet gaat ahe swara and malhar Visit