सुख म्हणजे नक्की काय असतं : शालिनीचं खरं रुप येणार समोर; माई देतील का शिक्षा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2021 16:28 IST2021-09-12T16:23:03+5:302021-09-12T16:28:47+5:30
Sukh mhanje nakki kay asta : गणेशोत्सव सुरळीत पार पडल्यानंतर शालिनीचं खरं रूप सगळ्यांसमोर येणार आहे. त्यामुळे या मालिकेत नवा ट्विट पाहायला मिळणार आहे.

सुख म्हणजे नक्की काय असतं : शालिनीचं खरं रुप येणार समोर; माई देतील का शिक्षा?
सध्याच्या काळात छोट्या पडद्यावर अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. मात्र, या मालिकांच्या गर्दीत कमी कालावधीत तुफान लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे 'सुख म्हणजे नक्की काय असते'. या मालिकेत घरकाम करणाऱ्या मुलीचा घर मालकीन होण्याचा प्रवास अत्यंत सुंदररित्या रेखाटण्यात आला आहे. त्यामुळेच ही मालिका सध्या लोकप्रिय होत आहे. गणेशोत्सव सुरु असल्यामुळे सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. यामध्येच हा उत्साह मालिकांमध्येही पाहायला मिळतोय. नुकतंच शिर्के-पाटील कुटुंबात गणरायाचं आगमन झालं असून आता गौराईदेखील त्यांच्या अंगणात येणार आहेत. मात्र, या उत्सवानंतर शालिनीचा खरा चेहरा कुटुंबासमोर येणार आहे.
शिर्के-पाटील कुटुंबात बाप्पाचं जंगी स्वागत झाल्यानंतर त्याच थाटात गौराईचंदेखील स्वागत करण्यात आलं. मात्र, हा गणेशोत्सव सुरळीत पार पडल्यानंतर शालिनीचं खरं रूप सगळ्यांसमोर येणार आहे. त्यामुळे या मालिकेत नवा ट्विट पाहायला मिळणार आहे.
जशी माय तशी लेक! सोनाली खरेच्या मुलीचे 'हे' ग्लॅमरस फोटो एकदा पाहाच
दरम्यान, या गणेशोत्सवानंतर मालिकेत आणखी एक नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. शालिनीचा खरा चेहरा संपूर्ण कुटुंबासमोर येणार आहे. त्यामुळे माईसाहेब शालिनीला नेमका कसा धडा शिकवणार हे पहाणं उत्सुकतेचं ठरणार आहे.