'तू हवा होतास'! अरुंधतीपासून दुरावला यश; Video पाहून तुमचेही डोळे पाणावतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2021 12:46 IST2021-11-10T12:45:51+5:302021-11-10T12:46:24+5:30

Aai kuthe kay karte: यशच्या आठवणीत अरुंधतीला नीट झोपही येत नाहीये. तितक्यात यशचा फोन आल्यामुळे ती भावूक होते.

marathi serial aai kuthe kay karte yash and arundhati | 'तू हवा होतास'! अरुंधतीपासून दुरावला यश; Video पाहून तुमचेही डोळे पाणावतील

'तू हवा होतास'! अरुंधतीपासून दुरावला यश; Video पाहून तुमचेही डोळे पाणावतील

छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या 'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte)  या मालिकेत सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. अरुंधतीच्या आयुष्यात तिच्या जुन्या मित्राची एण्ट्री झाली आहे. त्यामुळे अनिरुद्ध थोडासा इनसिक्युअर झाला आहे. तर, दुसरीकडे मात्र यश विदेशात गेला आहे. त्यामुळे अरुंधतीला सतत यशची आठवण येत आहे. इतकंच नाही तर अलिकडेच झालेल्या कार्यक्रमात अरुंधतीने यशला प्रचंड मिस केल्याचं पाहायला मिळालं.

अलिकडेच स्टार प्रवाहने एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये अरुंधती यशला मिस करताना दिसत आहे. यशच्या आठवणीत तिला नीट झोपही येत नव्हती. तितक्यात यशचा फोन आल्यामुळे ती भावूक होते. इतकंच नाही तर यश तू हवा होतास असं म्हणत ती अचानकपणे रडू लागते.

'अनिरुद्ध आणि तू वेगळे व्हा'; अरुंधतीचा संजनाला थेट सल्ला

"यश तू हवा होतास रे. समोर हवा होतास. मला सारखं वाटत होतं तू विंगेत राहून माझ्याकडे बघतोयेस, स्टेजच्या मागे आहेस, स्टेजच्या समोर पहिल्या रांगेत बसून माझं गाणं ऐकतोय असंच वाटत होतं", असं अरुंधती म्हणाली.

दरम्यान, सध्या आई कुठे काय करते या मालिकेत अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. अरुंधती स्वत:च्या पायावर उभी राहिली असून सक्षमपणे प्रत्येक निर्णय घेताना दिसत आहे. तर, अनिरुद्ध पुन्हा एकदा संजनासोबत संसाराच्या कचाट्यात सापडला आहे.
 

Web Title: marathi serial aai kuthe kay karte yash and arundhati