"गप्प बसायचं नाही...", शिल्पा नवलकरांनी प्राची पिसाटचं केलं कौतुक; समीर विद्वांस, रुचिराचीही कमेंट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 11:09 IST2025-05-27T11:08:53+5:302025-05-27T11:09:47+5:30
मराठी इंडस्ट्रीतील अनेकांचा प्राची पिसाटला जाहीर पाठिंबा

"गप्प बसायचं नाही...", शिल्पा नवलकरांनी प्राची पिसाटचं केलं कौतुक; समीर विद्वांस, रुचिराचीही कमेंट
अभिनेत्री प्राची पिसाटला (Prachi Pisat) ज्येष्ठ अभिनेते सुदेश म्हशीळकरांनी (Sudesh Mhashilkar) आक्षेप्राह मेसेज पाठवले. याच मेसेजचे स्क्रीनशॉट प्राचीनेथेट सोशल मीडियावर शेअर करत त्यांचा पर्दाफाश केला. तसंच त्यांचं अकाऊंट हॅक झालं नसून याही आधी त्यांनी अशे मेसेज पाठवल्याचाही पुरावा दाखवला. यानंतर सुदेश म्हशीळकर यांना सगळेच ट्रोल करत आहेत. तसंच प्राचीला पाठिंबा देताना दिसत आहेत. मराठी इंडस्ट्रीतही अनेक जणांनी प्राचीला पाठिंबा दिला. लेखिका, अभिनेत्री शिल्पा नलवकर (Shilpa Navalkar) आणि इतर सेलिब्रिटींनीही प्राचीच्या पोस्टवर कमेंट केली आहे.
प्राची पिसाटने काल सुदेश म्हशीळकरांचं खरं रुप सर्वांसमोर आणलं. इंडस्ट्रीतले ज्येष्ठ अभिनेते असूनही अशा प्रकारे आक्षेप्राह मेसेज करतात हे तिने स्क्रीनशॉट शेअर करत दाखवलं. काल अभिनेत्री प्राजक्ता दिघेंनी तिला पाठिंबा देत पोस्ट केली होती. तर आता लेखिका, अभिनेत्री शिल्पा नवलकर यांनी लिहिले, "way to go प्राची...गप्प नाहीच बसायचं." यावर प्राचीने त्यांना रिप्लाय देत लिहिले,"१२ तासात तुम्ही पहिल्या महिला आहात ज्या गप्प बस असं म्हणाल्या नाहीत. धन्यवाद."
अभिनेत्री रुचिता जाधवनेही कमेंट करत लिहिले, "तू बोललीस त्यासाठी खरंच तुझा अभिमान वाटतो. कोणीही , कितीही सीनिअर असू दे त्यांना मर्यादा ओलांडण्याची किंवा दुसऱ्यांदा असहज करण्याची परवानगी नसते. एखाद्याचं कौतुक करताना न विचारता केलेलं फ्लर्टिंग सुद्धा एकप्रकारचं शोषणच आहे. आणि हो, पितळ उघडं पडल्यानंतर अकाऊंट हॅक झालं हे सोयीस्कररित्या दिलेलं कारण आहे. आपण आता हे बंद करायला हवं आणि लोकांना त्यांच्या कामासाठी जबाबदार धरायला हवं. तुला आणि त्या सर्व मुलींना ज्या याविरोधात बोलतात सर्वांना बळ मिळो. आम्ही तुमच्यासोबत आहोत."
याशिवाय दिग्दर्शक समीर विद्वांस यांनीही 'तू धाडसी मुलगी आहेस, Bravo' अशी कमेंट केली आहे. इंडस्ट्रीतील अनेकांनी आता प्राचीला उघडपणे पाठिंबा दिला आहे. दरम्यान अद्याप सुदेश म्हशीळकरांनी या सर्व प्रकारावर काहीही स्पष्टीकरण दिलेलं नाही. सध्या नेटकऱ्यांनी त्यांना लक्ष्य केलं आहे. मात्र त्यांनी यावर मौन साधलं आहे. ते सध्या 'कोण होतीस तू काय झालीस तू' मालिकेत दिसत आहेत.