निर्मिती सावंत अन् रिंकू राजगुरुची जुगलबंदी; किचन कल्लाकारच्या मंचावर कलाकारांची धम्माल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 16:19 IST2022-06-07T16:19:02+5:302022-06-07T16:19:52+5:30

Marathi actress: पहिल्यांदाच या लोकप्रिय अभिनेत्री एकाच मंचावर एकत्र येणार आहे.

marathi famous actress nirmiti sawant and rinku rajguru kitchen kalakar show | निर्मिती सावंत अन् रिंकू राजगुरुची जुगलबंदी; किचन कल्लाकारच्या मंचावर कलाकारांची धम्माल

निर्मिती सावंत अन् रिंकू राजगुरुची जुगलबंदी; किचन कल्लाकारच्या मंचावर कलाकारांची धम्माल

मराठी कलाविश्वातील दोन दिग्गज अभिनेत्री म्हणजे निर्मिती सावंत आणि रिंकू राजगुरू. गेल्या कित्येक वर्षांपासून निर्मिती सावंत त्यांच्या दर्जेदार अभिनयामुळे प्रेक्षकांचं मन जिंकत आहेत. तर, रिंकूने सध्याच्या काळात तरुणाईचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यामुळे या दोघीही सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. विशेष म्हणजे पहिल्यांदाच या लोकप्रिय अभिनेत्री एकाच मंचावर एकत्र येणार आहे.

सध्या सोशल मीडियावर किचन कल्लाकार या शोचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये पहिल्यांदाच या दोघी एकाच मंचावर उपस्थित राहणार असल्याचं दिसून येत आहे. इतकंच नाही तर या दोघींमध्ये मजेशीर जुगलबंदीही पाहायला मिळणार आहे.

दरम्यान, व्हायरल होत असलेल्या प्रोमोमध्ये या दोघींमध्ये एक खेळ रंगला आहे. या खेळात दोघी जणी स्वत:चं म्हणणं कसं योग्य हे एकमेकींना पटवून देत आहेत. इतकंच नाही तर या मंचावर रिंकूने 'सैराट'मधील 'झिंगाट' या गाण्यावर डान्सही केला.
 

Web Title: marathi famous actress nirmiti sawant and rinku rajguru kitchen kalakar show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.