ऐश्वर्या-अविनाश यांच्यात नेमकं झालं तरी काय? लग्नाच्या 28 वर्षानंतर शेअर केले 'अनुभवाचे बोल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 16:24 IST2024-03-06T16:23:33+5:302024-03-06T16:24:20+5:30

Aishwaryanarkar: ऐश्वर्या आणि अविनाश नारकर ही जोडी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ते कायम त्यांच्या आयुष्यातील काही किस्से, घडामोडीही चाहत्यांसोबत शेअर करत असतात.

marathi couple aishwarya and avinash narkar share funny reel | ऐश्वर्या-अविनाश यांच्यात नेमकं झालं तरी काय? लग्नाच्या 28 वर्षानंतर शेअर केले 'अनुभवाचे बोल'

ऐश्वर्या-अविनाश यांच्यात नेमकं झालं तरी काय? लग्नाच्या 28 वर्षानंतर शेअर केले 'अनुभवाचे बोल'

मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन जोडी म्हणजे ऐश्वर्या नारकर (aishwarya narkar)आणि अविनाश नारकर (avinash narkar). गेल्या कित्येक वर्षांपासून ही जोडी मराठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. कलाविश्वासह ही जोडी सोशल मीडियावरही सक्रीय आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये कायम त्यांच्याविषयीची चर्चा रंगत असते. यामध्येच ते नवनवीन पोस्टही चाहत्यांसोबत शेअर करत असतात. सध्या असाच त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

ऐश्वर्या आणि अविनाश नारकर ही जोडी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ते कायम त्यांच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल आयुष्यातील काही किस्से, घडामोडीही चाहत्यांसोबत शेअर करत असतात. यात अनेकदा ते काही फनी व्हिडीओ सुद्धा शेअर करतात. यावेळी त्यांनी एक मजेशीर रील शेअर केलं आहे. हा व्हिडीओ ऐश्वर्या नारकर यांनी शेअर केला असून 'अनुभवाचे बोल' असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे.

दरम्यान, मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणून ऐश्वर्या-अविनाश यांच्याकडे पाहिलं जातं. आजवर या जोडीने अनेक गाजलेल्य सिनेमा, मालिकांमध्ये एकत्र स्क्रीन शेअर केली आहे. तसंच सोशल मीडियावरील त्यांचे रिल्सही अनेकदा व्हायरल होतात.

Web Title: marathi couple aishwarya and avinash narkar share funny reel