Maharashtrachi Hasya Jatra : अखेर प्रतीक्षा संपली! ‘या’ दिवशी रिटर्न येतेय ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’, पाहा प्रोमो
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2022 13:38 IST2022-07-22T13:36:55+5:302022-07-22T13:38:19+5:30
Maharashtrachi Hasya Jatra : गेल्या काही दिवसांपासून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने ब्रेक घेतला होता. पण आता चाहत्यांसाठी आनंदाची वार्ता आहे. होय, तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्यजत्राचं नवं पर्व लवकरच सुरू होतेय.

Maharashtrachi Hasya Jatra : अखेर प्रतीक्षा संपली! ‘या’ दिवशी रिटर्न येतेय ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’, पाहा प्रोमो
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasya Jatra) हा धम्माल कॉमेडी शो गेल्या साडेतीन वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. कलाकारांचे एकापेक्षा एक भारी पंच प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडतात. पण गेल्या काही दिवसांपासून या कार्यक्रमाने ब्रेक घेतला होता. पण आता चाहत्यांसाठी आनंदाची वार्ता आहे. होय, तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्यजत्राचं नवं पर्व लवकरच सुरू होतेय.
दिग्गज विनोदवीर समीर चौगुले, वनिता खरात, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर,गौरव मोरे आपल्या विनोदाने आणि अभिनयाने प्रेक्षकांना हसवून लोटपोट करण्यासाठी येत्या येत्या 15 ऑगस्टपासून पुन्हा पडद्यावर परतत आहेत. सोम ते गुरुवार रात्री 9 वाजता हा शो सर्वांना पाहता येणार आहे.
नुकतंच सोनी मराठीने एक प्रोमो रिलीज केला आहे. या प्रोमोमध्ये कलाकारांमध्ये विनोदी संवाद रंगलेला दिसून येत आहे. सोबतच कलाकार आपण रिटर्न येत असल्याची गोड बातमी चाहत्यांना देत आहेत. चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे आता ही मंडळी आठवड्यातू दोन नव्हे तर तब्बल चार दिवस भेटणार आहेत.
हा प्रोमो रिलीज होताच चाहत्यांची आनंद व्यक्त केला आहे. फायनली, चालू होतंय एकदाचं, अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. मस्त, या लवकर..., असं म्हणत एका चाहत्याने आनंद व्यक्त केला आहे. जशी गणपतीची आतुरतेने वाट पाहात आहोत, तशीच तुमचीही वाट पाहत आहोत... जी गाडी मिळेल ती पकडून लवकरात लवकर या, असं एका चाहत्याने म्हटलं आहे. हास्यजत्रा कधीही बंद करू नका. एक वेळ बाकीच्या सगळ्या मालिका बंद करा, पण हास्यजत्रा नको, अशी कमेंट एका युजरने केली आहे.
या कार्यक्रमात अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता प्रसाद ओक परीक्षकाच्या भूमिकेत दिसून येतात. तर अभिनेत्री प्राजक्ता माळी होस्टच्या भूमिकेत दिसून येते. या तगड्या स्टार कास्ट आणि स्पर्धकांमुळे या कार्यक्रमाची प्रचंड लोकप्रियता आहे.