विशाखा सुभेदार यांचा मुलगा मुंबईत परतला; म्हणाल्या, "१० दिवसांनी लेकाला पाहिलं..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 09:56 IST2026-03-10T09:56:17+5:302026-03-10T09:56:53+5:30

लंडनला निघालेला अभिनय सुभेदार, विमान कुवेतमध्येच थांबलं; नक्की काय काय घडलं?

marathi actress vishakha shubhedar s son abhinay subhedar returned in mumbai was stucked in kuwait amid middle east tension | विशाखा सुभेदार यांचा मुलगा मुंबईत परतला; म्हणाल्या, "१० दिवसांनी लेकाला पाहिलं..."

विशाखा सुभेदार यांचा मुलगा मुंबईत परतला; म्हणाल्या, "१० दिवसांनी लेकाला पाहिलं..."

मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा अभिनय सुभेदार कुवेतमध्ये अडकला होता. दहा दिवसांपूर्वी तो लंडनला जात होता मात्र मध्य पूर्वेतील तणावामुळे त्याचं विमान कुवेतमध्ये उतरलं. तिथे तो हॉटेलमध्येच राहत होता. आपल्या मुलाला सुखरुप मुंबईत परत आणावं यासाठी त्यांनी सरकारकडे विनंती केली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांना आश्वासनही दिलं होतं. आज अखेर आठवडाभराने अभिनय सुभेदार मुंबईत परतला आहे. मध्यरात्री ३ वाजता तो मुंबई विमानतळावर दाखल झाला आणि विशाखा सुभेदार यांच्या जीवात जीव आला. लेक परतल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला आहे. काय म्हणाल्या विशाखा सुभेदार?

एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत विशाखा सुभेदार म्हणाल्या, "व्हिडीओ केला होता तेव्हाही माझ्या डोळ्यात पाणी होतं आणि आज आनंदाश्रू आहेत. मी पोराला जवळजवळ १० दिवसांनी पाहिलं. कुवेतला ज्या हॉटेलमध्ये तो राहत होता तिथे जवळच मिसाईल, ड्रोन पडत असल्याचं तो सांगायचा तेव्हा मी टेन्शनमध्ये असायचे. खूप घाबरले होते. आता त्याला बघून खूप आनंद झालाय. तिथे नक्की काय परिस्थिती होती ते आता त्याने आल्यावर सविस्तर सांगितलं. दिवसरात्र सायरन वाजत होते ज्यामुळे भीतीचंच वातावरण होतं असं तो म्हणाला."

त्या पुढे म्हणाल्या, "आज १२० लोक परत आले. त्यापैकी २४ जणांचे व्हिसा अडकले होते. सरकारने सगळ्यांचं काम केलं. मुलाला कसं आणता येईल यासाठी मी तो व्हिडीओ पोस्ट केला होता आणि एकनाथ शिंदेंनी लगेच त्याची दखल घेतली. कोणी म्हणत होतं की दुबईतून लगेच व्यवस्था होऊ शकते पण कुवेतमधून अवघड आहे. कारण तिथली एअरस्पेस मिळत नव्हती. म्हणून मी जास्त चिंतेत होते. पण सरकारने तात्काळ दखल घेतली आणि सूत्र हलवली. कुवेतचा व्हिसा नंतर सौदीचा व्हिसा हवा होता. एम्बेसीकडून सर्व व्यवस्था केली गेली. या सगळ्या यंत्रणेमुळेच आज अभिनय  घरी परतला आहे त्यामुळे त्यांचे आभार."

Web Title : विशाखा सुभेदार का बेटा कुवैत से मुंबई लौटा, अभिनेत्री ने जताई खुशी।

Web Summary : अभिनेत्री विशाखा सुभेदार का बेटा अभिनय, मध्य पूर्व तनाव के कारण कुवैत में फंसा था, सुरक्षित मुंबई लौट आया। उन्होंने राहत व्यक्त की और सरकार को त्वरित कार्रवाई के लिए धन्यवाद दिया।

Web Title : Vishakha Subhedar's son returns to Mumbai after Kuwait ordeal.

Web Summary : Actress Vishakha Subhedar's son, Abhinay, stranded in Kuwait due to Middle East tensions, returned safely to Mumbai. She expressed relief and gratitude to the government for their swift action in bringing him home after days of worry.