वीणा जगतापला करायचंय लग्न? मेट्रोमोनियल साईटवर अभिनेत्रीचे प्रोफाईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 11:26 IST2023-07-10T11:25:08+5:302023-07-10T11:26:20+5:30

Veena jagtap: वीणाने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने एका मेट्रोमोनियल साईटवर तिचं प्रोफाइल असल्याचं सांगितलं आहे.

marathi actress veena jagtap angry on matrimonial fake profile share post | वीणा जगतापला करायचंय लग्न? मेट्रोमोनियल साईटवर अभिनेत्रीचे प्रोफाईल

वीणा जगतापला करायचंय लग्न? मेट्रोमोनियल साईटवर अभिनेत्रीचे प्रोफाईल

बिग बॉस मराठीच्या माध्यमातून विशेष प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे वीणा जगताप (veena jagtap). फिल्मी करिअरपेक्षा वीणा तिच्या पर्सनल आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिली. यात तिचं आणि बिग बॉस मराठीचा विजेता शिव ठाकरे यांचं प्रेम प्रकरण तर चांगलंच गाजलं. विशेष म्हणजे या दोघांचा ब्रेकअप झाल्यानंतर अनेकांनी वीणा आता लग्न कधी करणार हा एकच प्रश्न तिला विचारायला सुरुवात केली आहे. यामध्येच आता एका मेट्रोमोनियल साईटवर वीणाचं अकाऊंट असल्याचं समोर आलं आहे. याविषयी वीणाने सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली आहे.

वीणाने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने एका मेट्रोमोनियल साईटवर तिचं प्रोफाइल असल्याचं सांगितलं आहे. विशेष म्हणजे वीणाचं हे फेक प्रोफाईल असून याविषयी तिने नाराजी व्यक्त केली आहे.

“मला एका चाहत्याने नुकताच हा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. हा फोटो पाहिल्यावर मला धक्काच बसला. मला अजिबात कळत नाही की लोक असं का करतात? मेट्रोमोनियल साईटवरही खोटी माहिती. मुळात मी सॉफ्टवेअर प्रोफेशनल आहे ही गोष्ट मलाही माहित नाही. मी कधीच कोणत्या मेट्रोमोनियल साईटवर नव्हते आणि नसेनही. मी गेल्यावर्षीदेखील अशाच प्रकारच्या खोट्या बातम्या ऐकल्या होत्या. त्यामुळे अशा खोट्या प्रोफाईलपासून सावध राहा. पण काहीही म्हणा, हे प्रोफाईल बनवणाऱ्या व्यक्तीच्या हिंमतीला दाद द्यावीशी वाटते, असं वीणाने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, वीणा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. बिग बॉससह ती अन्य काही मालिकांमध्येही झळकली आहे. तसंच ती प्रोफेशनल मेकअप आर्टिस्टही आहे.
 

Web Title: marathi actress veena jagtap angry on matrimonial fake profile share post