'तू ही रे माझा मितवा' मालिकेतून 'या' अभिनेत्रीची अचानक एक्झिट! रिप्लेसमेन्टची भूमिका कोण साकारणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 16:58 IST2025-12-17T16:53:11+5:302025-12-17T16:58:34+5:30
'या' अभिनेत्रीने सोडली'तू ही रे माझा मितवा' मालिका, कारण अस्पष्ट

'तू ही रे माझा मितवा' मालिकेतून 'या' अभिनेत्रीची अचानक एक्झिट! रिप्लेसमेन्टची भूमिका कोण साकारणार?
Tu Hi Re Majha Mitwa: छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये दिवसेंदिवस काही ना काही ट्विस्ट येत असतात. या मालिकांमध्ये अनेकदा कथानकाच्या गरजेनूसार जुन्या कलाकारांची एक्झिट होते. तर कधी नव्या पात्राची एन्ट्री केली जाते. अनेकदा कलाकार काही वैयक्तिक कारणास्तव मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतात. त्यानंतर रिप्लेसमेन्ट म्हणून कोण भूमिका साकारणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष असतं. अशाच एका मराठी मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्रीने एक्झिट घेतली आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तू ही रे माझा मितवा’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं आहे. या मालिकेत अभिनेत्री शर्वरी जोग आणि अभिजीत आमकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यांच्यासह अभिनेता आशुतोष गोखले, रुपल नंद, सुरभी भावे अशी तगडी स्टारकास्ट आहे. दरम्यान, मालिका प्रसारित झाली त्यावेळी अर्णवच्या आजीची भूमिका अभिनेत्री स्वाती चिटणीस यांनी साकारली होती. मात्र, काही महिन्यापूर्वी त्यांनी ही मालिका सोडली.
दरम्यान,स्वाती चिटणीस यांची रिप्लेसमेन्ट म्हणून मालिकेत वंदना पंडित सेठ अर्णवच्या आजीच्या भूमिकेत पाहायला मिळाल्या. अशातच मालिकेत मोठा बदल झाल्याचा पाहायला मिळत आहे. सध्या ‘तू ही रे माझा मितवा’ मालिकेत राकेशने पैशांसाठी चोरीचा डाव आखला आहे. राकेश चक्क घरातील दत्तगुरुंच्या पादूका गायब करतो. असा ट्रॅक दाखवण्यात आला आहे. या दरम्यान, नव्या अभिनेत्रीची झलक पाहायला मिळतेय. वंदना पंडित यांनी अचानक मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर अभिनेत्री मानसी मागीकर अर्णवच्या आजीचं हे पात्र साकारायला सुरुवात केली आहे. परंतु, त्यांनी मालिका अचानक का सोडली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.