मैत्रीणीमुळे झाली भेट, दादा म्हणून हाक मारायची अन्...! 'ठरलं तर' मग मधील कल्पना सुभेदारची लव्हस्टोरी आहे खूपच फिल्मी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 16:02 IST2025-10-24T15:40:43+5:302025-10-24T16:02:23+5:30
मैत्रीणीमुळे झाली भेट, दादा म्हणून हाक मारायची अन्...! 'ठरलं तर' मग मधील कल्पना सुभेदारची हटके लव्हस्टोरी

मैत्रीणीमुळे झाली भेट, दादा म्हणून हाक मारायची अन्...! 'ठरलं तर' मग मधील कल्पना सुभेदारची लव्हस्टोरी आहे खूपच फिल्मी
Prajakata Dighe: अभिनेत्री प्राजक्ता दिघे या मराठी मनोरंजनविश्वातील नावाजलेल्या अभिनेत्रींपैकी एक आहेत. वेगवेगळ्या मराठी मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम करत त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. सध्या त्या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय 'ठरलं तर मग' या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारताना दिसत आहेत.या मालिकेत अभिनेत्री प्राजक्ता दिघे अर्जुनच्या आईची म्हणजे कल्पना ही भूमिका साकारत आहेत.अशातच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमुळे त्या चर्चेत आल्या आहेत.
ठरलं तर मग फेम अभिनेत्री प्राजक्ता कुलकर्णी दिघे या सध्या त्यांच्या मालिकेतील भुमिकेमुळे चर्चेत आहेत. अलिकडेच त्यांनी पती राजन यांच्या सह दिवाळी पाडवा विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या आयुष्यातील मजेशीर किस्से शेअर केले. यावेळी त्या म्हणाल्या राजन यांना पहिल्यांदाच पाहून त्या त्यांच्या एकतर्फी प्रेमात पडल्या होत्या. सुरुवातीला त्या राजन यांना दादा म्हणायच्या. 'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्राजक्ता दिघे यांनी त्यांच्या प्रेमकहाणीचा खास किस्सा शेअर केला. "यांची चुलत बहिण ही माझी लहानपणापासूनच मैत्रीण आहे. तर हा सुट्टीमध्ये तिच्याकडे राहायला यायचा. तेव्हा आम्ही दादरला राहायचो तर हा अंधेरीला राहायला. त्यावेळी शाळेच्या दिवसांमध्ये मी तिच्याकडे अभ्यासाला राहायला जायचे."
त्यानंतर प्राजक्ता म्हणाल्या, "ती कायम याचं कौतुक करायची.तिच्या तोंडी नेहमी राजनचं नाव असायचं. थोडक्यात,हा तिचा गुरु होता. तो जे काम करायचा ती ते आम्हाला सांगायची. त्यावेळी मीही त्याला दादा म्हणायचे.तेव्हा मीही तिला मोठ्या उत्सुकतेने याबद्दल विचारायचे.त्याचदरम्यान, तिने घराचं नवीन काम केल्याचे फोटो दाखवले. ती गोष्ट मी माझ्या बाबांनी सांगितली. त्यात माझे बाबा खूप हौशी होते. आम्ही त्यावेळेस चाळीत राहायचो. अर्चनाचं सजवलेलं घर पाहून बाबा म्हणाले, बोलाव त्याला आपण काहीतरी करायला सांगू. त्यानंतर मग याने संपूर्ण घराचं काम घेतलं. पण, जेव्हा तो पहिल्यांदा माझ्या घरी आला तेव्हा लव्ह अॅट फर्स्ट साईट असं झालं. "
अशी झालेली प्रेमकहाणीा सुरुवात...
"सगळ्यात मजेशीर गोष्ट म्हणजे माझी पहिली मालिका रथचक्र आली होती. त्यातील माझा नऊवारीतील सोज्वळ लूक पाहून बायको पाहिजे तर अशी असं तो सहज म्हणाला होता.यावेळी प्राजक्ता यांचे पती म्हणाले, घरात जेव्हा हिला पाहिलं तेव्ही ती हिच आहे हे कळालं नव्हतं. कारण तेव्हाचा लूक वेगळा होता.पुढे प्राजक्ता म्हणाल्या, "त्यानंतर आमच्या घरचं काम चालू झालं होतं. तेव्हा मग रोज मी पहिले दोन लेक्चर बसायचे आणि नंतर गायब असायचे. याला भेटायचं म्हणून मी घरी यायचे. हे सगळं मैत्रीणीच्या लक्षात आलं. कारण मी राजनदादावरून राजनवर आले. मग तिने अर्चनाला सांगितलं. अर्चनाने मला विचारल्यानंतर मी लगेच हो म्हटलं. पण याचं असं झालं होतं की तो म्हणाला एक वर्ष बघू. मला आवडणारा हा पहिला मुलगा होता. तेव्हा माझी मैने प्यार किया साठी ऑडिशन सुरु होती. पण, मी तिथे गेले नाही, कारण याने पण मला तिच तारीख दिली. त्यामुळे मी तिकडे गेले नाही.हा माझ्या आयुष्याचा प्रश्न होता, नंतर मी त्याच्या घरी गेले. " असा प्रेमकहाणीचा किस्सा प्राजक्ता यांनी सांगितला.