"लोक त्रास देतात, शिव्या घालतात पण...", प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेवर जुई गडकरीच्या ऑनस्क्रीन सासूबाई काय म्हणाल्या?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 18:31 IST2025-07-29T18:25:03+5:302025-07-29T18:31:45+5:30

'ठरलं तर मग' ही मराठी मालिकाविश्वातील सर्वाधिक लोकप्रिय असणारी मालिका आहे.

marathi actress tharla tar mag fame prajakta kulkarni talk in interview about fans by seeing her in kalpana role | "लोक त्रास देतात, शिव्या घालतात पण...", प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेवर जुई गडकरीच्या ऑनस्क्रीन सासूबाई काय म्हणाल्या?

"लोक त्रास देतात, शिव्या घालतात पण...", प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेवर जुई गडकरीच्या ऑनस्क्रीन सासूबाई काय म्हणाल्या?

Prajakata Kulkarni: 'ठरलं तर मग' ही मराठी मालिकाविश्वातील सर्वाधिक लोकप्रिय असणारी मालिका आहे. अभिनेत्री जुई गडकरी आणि अमित भानुशाली मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहेत. टीआरपीच्या शर्यतीत नंबर असणाऱ्या मालिकेसह त्यातील कलाकारांची प्रचंड क्रेझ आहे. सध्या या मालिकेत कोर्टरुम ड्रामा सुरु असल्याचा पाहायला मिळतो. त्यामुळे विलास मर्डर केसचा निकाल काय लागणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष आहे. अशातच याचदरम्यान, मालिकेत सायलीच्या म्हणजेच जुई गडकरीच्या सासूबाईंची भूमिका साकारणाऱ्या प्राजक्ता कुलकर्णी चर्चेत आल्या आहेत.

नुकताच अभिनेत्री प्राजक्ता कुलकर्णी यांनी स्टार मीडिया या युट्यूब चॅनेलसोबत संवाद साधला. त्यादरम्यान, मालिकेतील पूर्वीची कल्पना आणि आताची कल्पना सुभेदारच्या वागणूकीतला फरक पाहून प्रेक्षकांच्या येणाऱ्या प्रतिक्रियांविषयी त्यांनी खुलासा केला आहे. तेव्हा त्या म्हणाल्या, आधी माझं जेव्हा सायलीचं नातं खूप होतं, तेव्हा मला अनेकांचे  मेसेजेस यायचे. बरेच डीएम्स यायचे की आम्हाला तुमच्यासारखी सासू पाहिजे. सायलीवरती ज्या खूप प्रेम करतात तशीच आम्हाला सासू पाहिजे. असे भरभरुन मेसेज यायचे. मग तुम्हाला मुलगा आहे तर तुमची पण सून अशीच असेल. 

मग पुढे त्यांनी  सांगितलं, पण जेव्हापासून मालिकेत मी सायलीवर रागवायला लागले तेव्हा मला प्रेक्षक त्रास देतात. म्हणजे त्यांचं ते प्रेम आहे जे मालिका आवडीने बघत आहेत आणि त्यांना असं वाटतंय की मी परत सायलीवर प्रेम करावं. मग ते म्हणतात, तुम्हाला कळत नाहीये का तन्वी कशी वागते आहे तशी वागतेय. तरू तु्म्ही तिच्या बाजूने का बोलता. खूप मला प्रेमाने शिव्या घालत असतात. पण मी, म्हणेन प्रेमाने शिव्या घालणं हे सुद्धा या भूमिकेचं यश आहे, जे तुम्हाला पाहिजेच असतं. मी निगेटिव्ह भूमिका करतेय त्याबद्दल ज्या पद्धतीने रिप्लाय येत आहेत. म्हणजेच प्रेक्षक मालिका बघत आहेत. अशा भावना प्राजक्ता यांनी व्यक्त केल्या. 

Web Title: marathi actress tharla tar mag fame prajakta kulkarni talk in interview about fans by seeing her in kalpana role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.