सुरुची अडारकरच्या मेहंदीचा Video व्हायरल, म्हणाली, 'स्वप्नवत वाटावं अशी...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2023 16:07 IST2023-12-07T16:06:22+5:302023-12-07T16:07:02+5:30

सुरुचीने नुकताच तिच्या मेंहंदी समारंभाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

marathi actress Suruchi Adarkar mehendi video viral tied knot with piyush ranade | सुरुची अडारकरच्या मेहंदीचा Video व्हायरल, म्हणाली, 'स्वप्नवत वाटावं अशी...'

सुरुची अडारकरच्या मेहंदीचा Video व्हायरल, म्हणाली, 'स्वप्नवत वाटावं अशी...'

'का रे दुरावा' फेम मराठी अभिनेत्री सुरुची अडारकर (Suruchi Adarkar) हिने पियुष रानडेसोबत (Piyush Ranade) गुपचूप लग्नगाठ बांधली आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. पियुष आणि सुरुचीची नक्की कधी प्रेमात पडले याचा थांगपत्ताही कोणाला लागला नाही. अचानक काल लग्नाचे फोटो शेअर करत दोघांनी ही बातमी चाहत्यासोबत शेअर केली. सुरुचीने नुकताच तिच्या मेंहंदी समारंभाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

जांभळ्या रंगाचा सुंदर ड्रेस, आकर्षक हेअरस्टाईल अशा लूकमध्ये सुरुचीचा मेहंदी समारंभ पार पडला. याची झलक तिने व्हिडिओमधून शेअर केली आहे. यामध्ये पियुष तिला मेहंदीचं ताट हातात देत आहे. दोघंही एकमेकांच्या डोळ्यात बघत आहेत. त्यांचा हा रोमँटिक क्षणही व्हिडिओत कैद झाला आहे. या खास दिवशी नव्या नवरीच्या चेहऱ्यावर कमालीचा आनंद दिसून येत आहे. 'अ ड्रीमी मेहंदी' असं कॅप्शन सुरुचीने व्हिडिओला दिलं आहे.

सुरुची आणि पियुषचा काल पुण्यात विवाहबद्ध झाले. या लग्नाची कोणालाच कानोकान खबर नव्हती. संध्याकाळी दोघांनी फोटो शेअर करत चाहत्यांना सरप्राईज दिलं. यानंतर त्यांचं रिसेप्शनही थाटात झालं. श्रेया बुगडे, भक्ती देसाई, हर्षद अटकरी, अर्चना निपाणकर हे कलाकार लग्नात उपस्थित होते. 

Web Title: marathi actress Suruchi Adarkar mehendi video viral tied knot with piyush ranade