"बिग बॉसच्या घरात जुळलेलं प्रेम बाहेर येईपर्यंत संपलेलं असतं, पण...", प्रसाद-अमृतासाठी मराठी अभिनेत्रीची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 11:52 AM2023-12-01T11:52:43+5:302023-12-01T11:53:21+5:30

अमृता आणि प्रसादचा फोटो शेअर करत मराठी अभिनेत्री आणि लावणी नृत्यांगणा सुरेखा कुडची यांनी पोस्ट शेअर केली आहे. 

marathi actress surekha kudchi shared special post for amruta deshmukh and prasad jawade | "बिग बॉसच्या घरात जुळलेलं प्रेम बाहेर येईपर्यंत संपलेलं असतं, पण...", प्रसाद-अमृतासाठी मराठी अभिनेत्रीची पोस्ट

"बिग बॉसच्या घरात जुळलेलं प्रेम बाहेर येईपर्यंत संपलेलं असतं, पण...", प्रसाद-अमृतासाठी मराठी अभिनेत्रीची पोस्ट

गेल्या काही दिवसात कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी लग्नाच्या बेडीत अडकत नवीन आयुष्याला सुरुवात केली. यापैकीच एक जोडी म्हणजे प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख. मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी असलेल्या प्रसाद-अमृताचे सूर 'बिग बॉस मराठी'च्या घरात जुळले होते. नुकतंच त्यांनी थाटामाटात लग्न करत नवीन आयुष्याला सुरुवात केली. अमृता आणि प्रसादचा फोटो शेअर करत मराठी अभिनेत्री आणि लावणी नृत्यांगणा सुरेखा कुडची यांनी पोस्ट शेअर केली आहे. 

सुरेखा कुडची यांना प्रवासादरम्यान अमृता-प्रसाद भेटले. त्यांच्याबरोबरचा फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी पोस्टही लिहिली आहे. "कोण कधी कुठे भेटेल काही सांगता येत नाही...पुणे मुंबई प्रवास करताना फूड मॉलला थांबलो. अचानक समोर नवीन लग्न झालेलं जोडपं आलं...अहो आपली सगळ्यांची लाडकी अमृता आणि प्रसाद . लग्नाच्या शुभेच्छा ही दिल्या आणि फोटो तो बनता है बॉस ...'बिग बॉस'च्या घरात जुळलेलं प्रेम बाहेर येईपर्यंत संपलेलं असतं असंच पाहिलंय आत्तापर्यंत... पण, हे दोघेही अपवाद...खूप मनापासून आनंद झाला . त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्या...," असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.

अमृता आणि प्रसाद 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वात सहभागी झाले होते. 'बिग बॉस'च्या घरातच त्यांच्याच मैत्री झाली होती. 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडताच अमृता-प्रसादने एकमेकांवरील प्रेमाची कबुली देत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. त्यानंतर त्यांनी गुपचूप साखरपुडाही उरकला होता. काही दिवसांपूर्वीच त्यांनी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे, 

Web Title: marathi actress surekha kudchi shared special post for amruta deshmukh and prasad jawade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.