"काठी अन् घोंगडं घेऊ द्या की...", ५७ वर्षांच्या सुकन्या मोनेंचा भन्नाट डान्स, लग्नातील व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 16:02 IST2026-02-06T16:01:17+5:302026-02-06T16:02:17+5:30

साक्षी-अर्थवच्या संगीत सोहळ्यात 'कोण होतीस तू काय झालीस तू' मालिकेच्या टीमने रंगत आणली. सुकन्या मोने यांनी खास डान्स परफॉर्मन्स सादर केला. तर या संगीत सोहळ्यात मालिकेतील कलाकार बेभान होईन नाचले.

marathi actress sukanya mone dance on kathi an ghongad song sakhi atharv wedding video | "काठी अन् घोंगडं घेऊ द्या की...", ५७ वर्षांच्या सुकन्या मोनेंचा भन्नाट डान्स, लग्नातील व्हिडीओ व्हायरल

"काठी अन् घोंगडं घेऊ द्या की...", ५७ वर्षांच्या सुकन्या मोनेंचा भन्नाट डान्स, लग्नातील व्हिडीओ व्हायरल

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय कपल नुकतंच लग्नाच्या बेडीत अडकलं आहे. 'कोण होतीस तू काय झालीस तू' फेम अभिनेत्री साक्षी महाजन आणि अभिनेता अथर्व कर्वे यांनी सप्तपदी घेत त्यांच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. साक्षी आणि अर्थवचा लग्नसोहळा आणि इतर कार्यक्रमाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. गुरुवारी त्यांचा संगीत सोहळा पार पडला. या संगीत सोहळ्याला अनेक कलाकारांनीही हजेरी लावली होती.

साक्षी-अर्थवच्या संगीत सोहळ्यात 'कोण होतीस तू काय झालीस तू' मालिकेच्या टीमने रंगत आणली. सुकन्या मोने यांनी खास डान्स परफॉर्मन्स सादर केला. तर या संगीत सोहळ्यात मालिकेतील कलाकार बेभान होईन नाचले. त्याचा व्हिडीओ समोर आला आहे. साक्षी-अर्थवच्या संगीत सोहळ्यातील एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये "काठी अन् घोंगडं घेऊ द्या की मला बी जत्रेला येऊ द्या की", या गाण्यावर कलाकार डान्स करताना दिसत आहे. हे गाणं सुरू होताच ५७ वर्षांच्या सुकन्या मोनेंनी असा ठेका धरला की सगळे पाहतच राहिले. या गाण्याच्या हुकस्टेप करतानाही त्या व्हिडीओत दिसत आहेत. तर त्यांना साक्षी गांधीने चांगली साथ दिली आहे. सुकन्या मोनेंचा भन्नाट डान्स पाहून चाहते त्यांचं कौतुक करत आहेत. 


अथर्व कर्वे हा मराठी आणि हिंदी टेलिव्हिजन आणि सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. अथर्वने 'बालगंधर्व', 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' अशा गाजलेल्या मराठी सिनेमांमध्य़े काम केलं आहे. याशिवाय 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' मालिकेत अथर्वने केलेली भूमिका चांगलीच गाजली.  तर साक्षी महाजन अलिकडेच 'कोण होतीस तू काय झालीस तू' या मालिकेत झळकली. या मालिकेपूर्वी साक्षीनं 'उदे गं अंबे' या मालिकेत काम केलं. यामध्ये तिने राणी नीलकांतीची भूमिका साकारली होती.

Web Title : शादी में सुकन्या मोने का ज़बरदस्त डांस वायरल!

Web Summary : मराठी कलाकार साक्षी महाजन और अथर्व कर्वे ने हाल ही में शादी की। उनके संगीत समारोह में, 57 वर्षीय सुकन्या मोने ने एक लोकप्रिय मराठी गाने पर अपने नृत्य से सबका ध्यान खींचा, और अपनी ऊर्जा और प्रदर्शन के लिए प्रशंसा अर्जित की।

Web Title : Sukanya Mone's energetic dance at wedding goes viral: Watch!

Web Summary : Marathi actors Sakshi Mahajan and Atharva Karve recently married. At their sangeet ceremony, Sukanya Mone, 57, stole the show with her dance to a popular Marathi song, earning praise for her energy and performance.