नवऱ्याच्या वाढदिवशी स्पृहाने लिहिली खास पोस्ट, Video शेअर करत दिल्या शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 15:48 IST2023-12-21T15:47:35+5:302023-12-21T15:48:01+5:30
स्पृहाने घरीच साध्या पद्धतीने वरदचा वाढदिवस साजरा केला आहे.

नवऱ्याच्या वाढदिवशी स्पृहाने लिहिली खास पोस्ट, Video शेअर करत दिल्या शुभेच्छा
मराठी अभिनेत्री, कवयित्री स्पृहा जोशी (Spruha Joshi) तिच्या गोड स्वभावाने प्रेक्षकांचं मन जिंकत असते. स्पृहा सध्या 'संकर्षण व्हाया स्पृहा' च्या कार्यक्रमांमध्ये व्यस्त आहे. यातील तिच्या कवितांचं सादरीकरण प्रेक्षकांना खूपच भावतं. स्पृहाचा नवरा वरद लघाटेचा आज वाढदिवस असून स्पृहाने नवऱ्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
स्पृहाने घरीच साध्या पद्धतीने वरदचा वाढदिवस साजरा केला आहे. तिने काही क्षण कॅमेऱ्यात कॅप्चर करत व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिने नवऱ्यासाठी छान केक बनवलेला दिसतोय. तसंच घर सजवलेलं दिसत आहे. स्पृहाने या व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये लिहिले,'हॅपी बर्थडे पार्टनर. मला माहितीये माझ्यासोबत पटवून घेणं इतकं सोपं नाहीए. पण आपली मैत्री अशीच फुलत राहो. तुला आयुष्यात सगळं चांगलं मिळू दे.'
स्पृहाने शेअर केलेल्या या व्हिडिओवर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केलाय.तुम्हाला माहीत आहे का वरदने त्याची कारकीर्द एक पत्रकार म्हणून सुरू केली. तो मराठीतीत एका नामांकित वर्तमानपत्रामध्ये लेख लिहित असे. पण आता पत्रकारितेचे क्षेत्र सोडून वरद मार्केटिंग प्रोफेशनकडे वळला आहे.२००८ पासून हे दोघे नात्यात होते आणि २४ फेब्रुवारी २०१३ ला हे दोघे विवाहबंधनात अडकले