जुनं ते सोनं! माधुरी दीक्षितच्या लोकप्रिय गाण्यावर मराठी अभिनेत्रीची मनमोहक अदाकारी; व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 15:24 IST2025-06-18T15:17:15+5:302025-06-18T15:24:44+5:30

माधुरी दीक्षितच्या लोकप्रिय गाण्यावर 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने बनवला सुंदर व्हिडीओ; नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस

marathi actress sonali captivating performance on madhuri dixit tu shayar hai main teri shayari popular song video goes viral | जुनं ते सोनं! माधुरी दीक्षितच्या लोकप्रिय गाण्यावर मराठी अभिनेत्रीची मनमोहक अदाकारी; व्हिडीओ व्हायरल

जुनं ते सोनं! माधुरी दीक्षितच्या लोकप्रिय गाण्यावर मराठी अभिनेत्रीची मनमोहक अदाकारी; व्हिडीओ व्हायरल

Sonali Patil: सध्या सोशल मीडिया हे हल्लीच्या काळातील एक प्रभावी माध्यम बनलं आहे. गावातील गल्लीबोळापासून ते शहारपर्यंत प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक झालं आहे. सर्वसामान्यांपासून ते अगदी सेलिब्रिटी मंडळींपर्यंत प्रत्येकजण यावर आपल्या दैनंदिन जीवनातील अपडेट शेअर करत असतात. अशातच नुकताच सोशल मीडियावर एका मराठी अभिनेत्रीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्याची सध्या सगळीकडे चर्चा होताना दिसतेय. ही अभिनेत्री म्हणजे सोनाली पाटील आहे.


'बिग बॉस मराठी'च्या तिसऱ्या पर्वातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सोनाली पाटील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या तिच्या डान्स व्हिडीओमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. सोनाली पाटील तिच्या अभिनाव्यतिरिक्त सोशल मीडियावरील फोटो, व्हिडीओमुळे अनेकदा चर्चेत येते. नुकताच सोनालीने इन्स्टाग्रामवर तिच्या डान्स करतानाचा भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे. सलमान-माधुरीच्या साजन चित्रपटातील तू शायर हैं या गाण्यावर सुंदर व्हिडीओ बनवला आहे. डोळ्यांना गॉगल लावून हिरव्यागार माळरानावर तिने हा व्हिडीओ शूट केला आहे. अभिनेत्रीच्या या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पडला आहे. "Old song perfect..", "वॉव..", अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी सोनालीच्या या व्हिडीओवर दिल्या आहेत. 

दरम्यान, सोनाली पाटील बिग बॉस मराठीच्या तिसऱ्याया पर्वातून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. सोनालीने 'बिग बॉस मराठी 'सह 'जुळता जुळता जुळतंय', 'आई तुळजाभवानी' यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. आपल्या सहज सुंदर अभिनयाने तिने प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे.

Web Title: marathi actress sonali captivating performance on madhuri dixit tu shayar hai main teri shayari popular song video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.