फुलांच्या माळा आणि प्रत्येक कोपऱ्यात दिवे! 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीने दिवाळीत असं सजवलं घर, पाहा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 08:40 IST2025-10-20T08:39:12+5:302025-10-20T08:40:11+5:30
दिवाळीनिमित्त घर छान पद्धतीने सजवलं जातं. आणि दिव्यांची आरासही केली जाते. बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीनेही दिवाळीत घरात छान रोषणाई केली आहे. याचा व्हिडीओ तिने शेअर केला आहे.

फुलांच्या माळा आणि प्रत्येक कोपऱ्यात दिवे! 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीने दिवाळीत असं सजवलं घर, पाहा व्हिडीओ
सगळीकडे दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. दिव्यांचा लख्ख प्रकाश आणि आतिषबाजीने संपूर्ण वातावरण उजळून निघालं आहे. दरवर्षी सेलिब्रिटीही मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करतात. दिवाळीनिमित्त घर छान पद्धतीने सजवलं जातं. आणि दिव्यांची आरासही केली जाते. बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीनेही दिवाळीत घरात छान रोषणाई केली आहे. याचा व्हिडीओ तिने शेअर केला आहे.
मराठी अभिनेत्री सई लोकूरने दिवाळीनिमित्त तिचं घऱ सजवलं आहे. सईने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिच्या घराची झलक पाहायला मिळत आहे. सईने फुलांच्या माळांनी संपूर्ण घर सजवलं आहे. तर घरातील प्रत्येक कोपऱ्यात तिने दिवा लावला आहे. सईचं घर अत्यंत सुंदर दिसत आहे. या व्हिडीओत सईचा नवरा आणि तिची लेकही दिसत आहे.
दरम्यान, सईने काही सिनेमांमध्ये काम केलं. पण तिला फारशी प्रसिद्धी मिळाली नाही. 'बिग बॉस मराठी'मुळे ती चर्चेत होती. त्यानंतर तिने सिनेइंडस्ट्रीला रामराम केला. २०२०मध्ये सईने तीर्थदीप रॉयशी लग्न करत संसार थाटला. तिला एक मुलगी असून आता ती संसारात रमली आहे.