मराठी इंडस्ट्रीत ग्रुपिझम आहे का? ऋतुजा बागवेचं स्पष्ट उत्तर, म्हणाली- "जे काम मिळेल ते अगदी प्रामाणिकपणे…"
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 11:29 IST2025-09-10T11:22:59+5:302025-09-10T11:29:21+5:30
मराठी इंडस्ट्रीत ग्रुपिझम आहे का? ऋतुजा बागवेने दिलं 'हे' उत्तर; म्हणाली...

मराठी इंडस्ट्रीत ग्रुपिझम आहे का? ऋतुजा बागवेचं स्पष्ट उत्तर, म्हणाली- "जे काम मिळेल ते अगदी प्रामाणिकपणे…"
Rutuja Bagwe : बॉलिवूड असो किंवा मराठी फिल्म इंडस्ट्री दोन्हीकडे ग्रुपिझम हा मुद्दा कायम चर्चेत राहिला आहे. याबद्दल अनेकांनी आपली मतं व्यक्त केली आहेत. तर काही हल्ली कलाकार देखील याबाबतीत उघडपणे बोलत असतात. अशातच मराठी अभिनेत्री ऋतुजा बागवेने या मुद्द्यावर आपलं मत मांडत मराठी इंडस्ट्रीतील गटबाजीवर भाष्य केलं आहे.
मराठी मालिका, नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे ऋतुजा बागवे. तिने आजवर अनेक कलाकृ्तींच्याद्वारे चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.नुकतीच ऋतुजा बागवेने आरपार या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली.या मुलाखतीमध्ये तिला मराठी फिल्म इंडस्ट्रीतील ग्रुपिझमबद्दल प्रश्न विचारण्यात आला.त्यावर बोलताना अभिनेत्री म्हणाली," ग्रुपिझम आहेच, या काय कुठल्याही क्षेत्रात आहेच आणि ते असणारंच आहे. त्यामुळे मी त्याच्यावर रडत बसत नाही. माझा मुळ स्वभाव जास्त बोलका नसल्यामुळे मी या ग्रुपचा भाग होत नाही. कॉन्टॅक्ट्स मिळवणं, गप्पा मारणं काम मिळेपर्यंत थांबणं हा माझा स्वभाव नाही. ते चुकीचं आहे की नाही पण मुळ स्वभावच तसा नसल्यामुळे मला हे सगळं करता येत नाही. सतत इव्हेंन्टस् अटेंड करा सतत दिसत राहा वगैरे तेही मला करायला आवडत नाही. "
पुढे अभिनेत्री म्हणाली, "स्वभावाचा भाग असल्यामुळे मी या गोष्टींमध्ये पडत नाही. त्यामुळे आपल्या हातात फक्त एकच उरतं जे मिळेल ते अगदी प्रामाणिकपणे करायचं की त्याची चार लोकांनी दखल घेतली पाहिजे. माझ्याबाबतीत असंच घडलं आहे आणि पुढेही असंच होत राहो. मला रातोरात मिळणारी प्रसिद्धीही नकोच. हळूहळू मिळालं तर चालेल. पण, मला असं काहीतरी काम करायचं आहे की ज्यामुळे लोक ओळखतील."
अशा भावना ऋतुजा बागवेने व्यक्त केल्या.