Engaged! मराठी अभिनेत्रीला मिळाला जोडीदार, साखरपुड्याचे फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 13:22 IST2025-12-16T13:21:55+5:302025-12-16T13:22:18+5:30
मराठी अभिनेत्री रिचा अग्निहोत्री हिनेदेखील गुपचूप साखरपुडा केला आहे. याचे फोटो समोर आले आहेत.

Engaged! मराठी अभिनेत्रीला मिळाला जोडीदार, साखरपुड्याचे फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी
मराठी कलाविश्वातील सेलिब्रिटी एकामागोमाग एक लग्नाच्या बेडीत अडकत आहेत. पूजा बिरारी-सोहम बांदेकर, प्राजक्ता गायकवाड, तेजस्विनी लोणारी यांनी त्यांच्या वैवाहिक जीवनाला सुरुवात केली आहे. तर काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री गायत्री दातारने साखरपुडा झाल्याची घोषणा केली. आता मराठी अभिनेत्री रिचा अग्निहोत्री हिनेदेखील गुपचूप साखरपुडा केला आहे. याचे फोटो समोर आले आहेत.
रिचा अग्निहोत्रीने अथर्व गोडसे याच्यासोबत साखरपुडा केला आहे. साखरपुड्याचे खास फोटो अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत. साखरपुड्यासाठी रिचा आणि अथर्वने खास पारंपरिक लूक केला होता. लाल रंगाची साडी नेसून रिचा नटली होती. तर अथर्वने पांढऱ्या रंगाची शेरवानी घातली होती. साखरपुडा झाल्यानंतर दोघांनीही हातातील अंगठी फ्लॉन्ट केली. पारंपरिक पद्धतीने रिचा आणि अथर्वचा साखरपुडा पार पडला. त्यानंतर रिसेप्शनसाठीही रिचा आणि अथर्वने खास लूक केला होता. रिचाने लेहेंगा परिधान केला होता.
रिचा आणि अथर्वला चाहते आणि सेलिब्रिटींनी शुभेच्छा दिल्या आहेत. रिचा अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम कथ्थक डान्सरही आहे. ती मुळची ठाण्याची असून 'मिस ठाणे' स्पर्धा ती जिंकली होती. 'अमूल'च्या जाहिरातीतही रिचा दिसली होती. 'घाडगे अँड सून' या मालिकेत ती महत्त्वाच्या भूमिकेत होती. तर 'स ला ते स ला ना ते' सिनेमातही ती झळकली आहे. 'ढोलकीच्या तालावर' या रिएलिटी शोमुळे तिला प्रसिद्धी मिळाली.