दिपाचं संपूर्ण कुटुंब एकाच फ्रेममध्ये; रेश्माने शेअर केला फॅमिली फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2023 12:01 IST2023-11-13T12:00:38+5:302023-11-13T12:01:09+5:30

Reshma shinde: रेश्माच्या कुटुंबात किती सदस्य आहेत तुम्हाला माहितीये का?

marathi actress reshma shinde share family photo | दिपाचं संपूर्ण कुटुंब एकाच फ्रेममध्ये; रेश्माने शेअर केला फॅमिली फोटो

दिपाचं संपूर्ण कुटुंब एकाच फ्रेममध्ये; रेश्माने शेअर केला फॅमिली फोटो

'रंग माझा वेगळा' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रेश्मा शिंदे (reshma shinde). उत्तम अभिनय कौशल्य आणि स्वभावातील साधेपणा यांच्या जोरावर रेश्माने अल्पावधीत प्रेक्षकांना आपलंसं केलं. रेश्मा सोशल मीडियावर सक्रीय आहे. त्यामुळे तिच्या जीवनातील अनेक किस्से, प्रसंग ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. यात अलिकडेच तिने चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच तिच्या कुटुंबासोबतचा फोटोही शेअर केला आहे.

दिवाळीमध्ये प्रत्येक जण आपआपल्या कुटुंबासोबत हा आनंद साजरा करत असतो. यात सेलिब्रिटीही अपवाद नाही. सध्या अनेक सेलिब्रिटी त्यांच्या कुटुंबासोबतचे फोटो, व्हिडीओ पोस्ट करुन त्यांची दिवाळी कशा पद्धतीने सेलिब्रेट करत आहेत हे चाहत्यांना सांगत आहेत. या रेश्माने तिच्या कुटुंबासोबतचा फोटो शेअर केला आहे.

रेश्माचं चौकोनी कुटुंब आहे. त्यामुळ रेश्मा तिच्या आई-वडील आणि भावासोबत राहते. विशेष म्हणजे रेश्माचे कुटुंबीय अत्यंत साधे असल्याचं या फोटोवरुन लक्षात येतं. तिच्या आईवडिलांच्या स्वभावातील हेच गुण रेश्मामध्ये आल्याचं सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे.

Web Title: marathi actress reshma shinde share family photo