'रात्रीस खेळ चाले' फेम अभिनेत्रीवर ओढावलेला जीवघेणा प्रसंग; म्हणाली-"सगळ्यांनीच आशा सोडलेली..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 17:59 IST2025-11-03T17:56:55+5:302025-11-03T17:59:10+5:30
'रात्रीस खेळ चाले' फेम अभिनेत्रीवर ओढावलेला जीवघेणा प्रसंग; म्हणाली...

'रात्रीस खेळ चाले' फेम अभिनेत्रीवर ओढावलेला जीवघेणा प्रसंग; म्हणाली-"सगळ्यांनीच आशा सोडलेली..."
Ashwini Mukadam: छोट्या पडद्यावरील गाजलेल्या मालिकांपैकी एक म्हणजे 'रात्रीस खेळ चाले'. या मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे 'रात्रीस खेळ चाले' मालिकेचे एकूण तीन भाग पाहायला मिळाले. दरम्यान, या मालिकेत झळकलेले सर्वच कलाकार आज सिनेसृष्टीत सक्रीय आहे. या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे अश्विनी मुकादम. रात्रीस खेळ चाले मालिकेत अभिनेत्रीचा मालवणी ठसका प्रेक्षकांना प्रचंड आवडला. सध्या ही अभिनेत्री एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. या मुलाखती अश्विनी यांनी त्यांच्या बालपणी घडलेला एक थराथर प्रसंग शेअर केला आहे.
अश्विनी मुकादम या मराठी मालिकाविश्वाती नावाजलेल्या अभिनेत्रींपैकी एक आहेत. रात्रीस खेळ चाले मालिकेसह त्यांनी मन धागा धागा जोडते नवा, 'सुखांच्या सरींनी हे मन बावरे' या मालिकांमधून महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. रात्रीस खेळ चाले मालिकेत त्यांनी साकारलेली सरिताची भूमिका लोकप्रिय ठरली. नुकतीच त्यांनी इट्स मज्जाला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी बालपणी घडलेला किस्सा सांगितला. त्या घटनेबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, "मी ज्यूनिअर केजीमध्ये असताना तेव्हा खूप जास्त भाजले होते. म्हणजे ही मुलगी वाचू शकेल अशी आशा सगळ्यांनीच सोडली होती. खरोखरंच मी हात वर टेकून परत आले.ते माझं आजारपण दीड-दोन वर्ष चालू होतं.थोड्या कालावधीनंतर माझ्या त्या जखमा बऱ्या झाल्यानंतर मी शाळेतही जायला लागले. पण, सगळं पूर्णपणे बरं होण्यासाठी दोन-अडीच वर्ष गेली. त्यामुळे मी शारिरीकदृष्ट्या कमजोर होते. त्यामुळे आईला वाटायचं ही अभ्यास करतेय तरी खूप झालं."
'रात्रीस खेळ चाले' मालिकेतून इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं...
त्यानंतर करिअरच्या सुरुवातीला इंडस्ट्रीत आलेल्या अनुभवांबद्दल बोलताना अश्विनी म्हणाल्या, 'रात्रीस खेळ चाले' माझी पहिली मालिका. एक-दोन मोठी नावं आहेत, त्यांनी सांगितलेलं की, ही काही अभिनेत्री होणार नाही. तिनं दिग्दर्शन करावं, दुसरं काहीतरी करावं. पण मला आतून माहित होतं, मी अभिनेत्री आहे आणि मी अभिनेत्रीच होणार. मी बॉडी शेमिंगही सहन केलं आहे. असा खुलासा त्यांनी या मुलाखतीत केला.