प्रसिद्ध मराठी अभिनेत्री रसिका वाखारकरने दिली प्रेमाची कबुली, कोण आहे होणारा नवरा?
By देवेंद्र जाधव | Updated: September 4, 2025 09:36 IST2025-09-04T09:34:09+5:302025-09-04T09:36:47+5:30
'तुझ्या पिरतीचा वणवा उरी पेटला' आणि अशोक मा.मा. फेम अभिनेत्रीने सोशल मीडियावर बॉयफ्रेंडसोबत फोटो पोस्ट करत प्रेमाची कबुली दिली आहे

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री रसिका वाखारकरने दिली प्रेमाची कबुली, कोण आहे होणारा नवरा?
'तुझ्या पिरतीचा वणवा उरी पेटला' मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे रसिका वाखारकर. रसिका सध्या 'अशोक मा.मा.' या मालिकेत काम करत आहे. रसिकांच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी आहे. रसिकाने सोशल मीडियावर प्रेमाची कबुली दिली आहे. इतकंच नव्हे तर तिने होणाऱ्या नवऱ्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत सर्वांना ही आनंदाची बातमी आहे. त्यामुळे सर्वांनी रसिकाचं अभिनंदन केलंय. कोण आहे रसिकाचा बॉयफ्रेंड?
रसिकाने दिली प्रेमाची कबुली
रसिकाने सोशल मीडियावर बॉयफ्रेंडसोबतचे रोमँटिक फोटो पोस्ट केले आहेत. रसिकाने बॉयफ्रेंडचा चेहरा लपवला आहे. त्यामुळे तो नक्की कोण आहे, याविषयी सर्वांच्या मनात प्रश्नचिन्ह आहे. आयुष्याचा नवा अध्याय, हळुवारपणे उलगडणार, अशा शब्दात रसिकाने ही आनंदाची बातमी सर्वांसोबत शेअर केली आहे. रसिकाने ही पोस्ट करताच सोशल मीडियावर अनेकांनी तिचं अभिनंदन केलंय. याशिवाय रसिकाचा बॉयफ्रेंड नक्की कोण आहे, अशी अटकळ बांधायला सुरुवात केली आहे.
अनेक नेटकऱ्यांनी रसिकाचा बॉयफ्रेंड अभिनेता इंद्रनील कामत असावा, असा अंदाज बांधला आहे. 'तुझ्या पिरतीचा वणवा उरी पेटला' मालिकेतून इंद्रनील आणि रसिकाची ऑन स्क्रीन जोडी प्रेक्षकांना चांगलीच आवडली. त्यामुळे रिअल लाईफमध्येही इंद्रनील आणि रसिका यांना बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड म्हणून बघायला आवडेल, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. आता रसिकाचा बॉयफ्रेंड नक्की कोण आहे, हे येणाऱ्या दिवसांमध्ये स्पष्ट होईलच.