'तारक मेहता'मध्ये माधवी भाभीच्या भूमिकेत दिसली असती 'ही' मराठी अभिनेत्री, पण...; म्हणाली- "सगळं विसरायला... "
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 13:24 IST2025-09-15T13:21:21+5:302025-09-15T13:24:29+5:30
'तारक मेहता'मध्ये 'माधवी भाभी'च्या भूमिकेत दिसली असती 'ही' मराठी अभिनेत्री,पण...; खुलासा करत म्हणाली...

'तारक मेहता'मध्ये माधवी भाभीच्या भूमिकेत दिसली असती 'ही' मराठी अभिनेत्री, पण...; म्हणाली- "सगळं विसरायला... "
TV Actress: छोट्या पडद्यावरील तारक मेहता ही मालिकेने गेली अनेक वर्षे प्रेक्षकांचं अविरतपणे मनोरंजन केलं. या मालिकेतील जेठालाल, दयाबेन, बबिताजी तसेच सोढी, माधवी भिडे, टप्पू सेना या पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं. दरम्यान, या मालिकेत माधवी भाभीची भूमिका साकारुन सोनालिका जोशी हे नाव घराघरात पोहोचलं. पण, तुम्हाला माहितीये का? या मालिकेत माधवी भाभीच्या भूमिकेत एक मराठी अभिनेत्री दिसली असती. मात्र, ऑडिशनमध्ये रिजेक्ट झाल्याने तिच्याजागी सोनालिकाची निवड करण्यात आली. या अभिनेत्रीचं नाव राधिका विद्यासागर आहे.
नुकतीच अभिनेत्री राधिका विद्यासागरने राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये अभिनेत्रीला 'तुला कधी रिजेक्शनचा सामना करावा लागलाय का?' असा प्रश्न विचारण्या आला. त्याबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली, "आताच एक वेब सीरिजसाठी ऑडिशन दिली होती. माझी खूप इच्छा होती ही ती भूमिका करण्याची मला संधी मिळावी.शिवाय त्यासाठी माझा छान लूक झाला होता, मी स्वत:वर खूप खुश होते. पण ते शक्य झालं नाही.पूर्वी बऱ्याचदा असं झालंय.मला का नाही घेतलं हा रोल मला का नाही मिळाला असं वाटायचं. असंभव मालिकेच्या वेळेस दोन-तीन भूमिकांसाठी असं झालं होतं. त्याची कारणं मला अजूनही कळाली नाहीत."
यापुढे अभिनेत्री म्हणाली,"तारक मेहताच्या . सोनालिकाच्या त्या रोलसाठी ऑडिशनसाठी गेले होते. पण,त्याचं पुढे काही कळलंच नाही. शिवाय ते तारक मेहता होतं हे मला खूप नंतर कळलं. काही गोष्टी अशा असतात की ज्यामुळे आपल्याला फरक पडत नाही आणि नंतर आपण विसरून जातो. सध्या मी जो रोल करतेय तो इतका भारी आहे की आता बाकी सगळं काही विसरायला होतं." असं म्हणत अभिनेत्रीने तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या.
वर्कफ्रंट
मराठीसह हिंदी मालिकाविश्व गाजवणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक नाव म्हणजे राधिका विद्यासागर. ठिपक्यांची रांगोळी,तुझं माझं ब्रेकअप या मालिकांमध्येही तिने काम केलं आहे. ठिपक्यांची रांगोळी तिने साकारलेलं सारिका आत्याचं पात्र प्रेक्षकांना प्रचंड भावलं. सध्या ही अभिनेत्री स्टार प्लस वाहिनीवरील 'उडने कि आशा'मालिकेत काम करताना दिसते आहे.