प्रार्थना बेहरेच्या आईला कधी पाहिलंय का? मुलगी अभिनेत्री असूनही राहतात एकदम साध्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 13:47 IST2022-04-11T13:45:42+5:302022-04-11T13:47:36+5:30
Prarthana behere: प्रार्थना मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. मात्र, तरीदेखील तिची आई अत्यंत साधी राहात असून त्यांच्या स्वभावातील हा साधेपणा त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत आहे.

प्रार्थना बेहरेच्या आईला कधी पाहिलंय का? मुलगी अभिनेत्री असूनही राहतात एकदम साध्या
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहरे (Prarthana behere). उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्य यांच्या जोरावर प्रार्थना कायम चाहत्यांवर भुरळ घालत असते. सध्या प्रार्थना 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत नेहा ही मुख्य भूमिका साकारत आहे. कलाविश्वासोबतच प्रार्थना सोशल मीडियावरही कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम तिच्या प्रोफेशनल लाइफसोबत पर्सनल लाइफमधील फोटो, व्हिडीओही शेअर करत असते.
प्रार्थना अनेकदा तिच्या नवऱ्यासोबत काही फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. मात्र, यावेळी तिने चक्क तिच्या आईसोबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून पहिल्यांदाच प्रार्थनाची आई नेटकऱ्यांच्या समोर आली असून तिच्या आईच्या चेहऱ्यावरील मायाळू भाव पाहून नेटकरीही त्यांच्या प्रेमात पडले आहेत.
प्रार्थना मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. मात्र, तरीदेखील तिची आई अत्यंत साधी राहात असून त्यांच्या स्वभावातील हा साधेपणा त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत आहे. सध्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे. अगदी सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेक जण या मायलेकीच्या व्हिडीओचं कौतुक करत आहेत.