सूर्यनमस्कार कसा करावा? प्राजक्ता माळीने सांगितली योग्य पद्धत, पाहा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 14:38 IST2025-11-09T14:38:15+5:302025-11-09T14:38:37+5:30
प्राजक्ताने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती सूर्यनमस्कार करताना दिसत आहे. सूर्यनमस्कार करण्याची योग्य पद्धत प्राजक्ताने या व्हिडीओतून दाखवली आहे.

सूर्यनमस्कार कसा करावा? प्राजक्ता माळीने सांगितली योग्य पद्धत, पाहा व्हिडीओ
प्राजक्ता माळी ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री. अभिनयासोबतच प्राजक्ता तिच्या फिटनेसकडेही विशेष लक्ष देताना दिसते. प्राजक्ता नियमितपणे योगा करते. त्यामुळेच ती एकदम फिट दिसते. प्राजक्ता अनेकदा तिच्या चाहत्यांनाही योगाचं महत्त्व पटवून देताना दिसते. व्यायाम करतानाचे अनेक व्हिडीओ ती शेअर करत असते. आताही तिने योगा करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.
प्राजक्ताने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती सूर्यनमस्कार करताना दिसत आहे. सूर्यनमस्कार करण्याची योग्य पद्धत प्राजक्ताने या व्हिडीओतून दाखवली आहे. सूर्यनमस्कार या एकाच योगप्रकारात अनेक योगासने येतात. त्यामुळेच नियमित सूर्यनमस्कार केल्याने शरीराला अनेक फायदेही होतात. या व्हिडीओत प्राजक्ता सूर्यनमस्कारसोबतच इतरही योग करताना दिसत आहे. "योग साधना… आनंदाचं सिक्रेट", असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे.
दरम्यान, प्राजक्ताला 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेमुळे प्रसिद्धी मिळाली. अनेक मालिका आणि काही सिनेमांमध्येही तिने काम केलं आहे. अभिनेत्री असण्यासोबतच प्राजक्ता एक उद्योजिकादेखील आहे. 'फुलवंती' सिनेमातून तिने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं. तर तिचा स्वत:चा ज्वेलरी ब्रँडही आहे.