प्राजक्ता गायकवाडने भर उन्हात खाल्ला हातगाडीवरचा गोळा; अभिनेत्रीने साधेपणाने जिंकली नेटकऱ्यांची मनं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 04:46 PM2022-04-28T16:46:13+5:302022-04-28T16:47:09+5:30

Prajakta Gaikwad: सध्या कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी समर व्हेकेशन एन्जॉय करतायेत. त्यामुळे अनेकांनी समर लूकमध्ये किंवा त्यांच्या व्हेकेशनमधील काही फोटो शेअर केले आहेत. परंतु, या सगळ्यांमध्ये प्राजक्ताची पोस्ट चर्चेत येत आहे.

marathi actress Prajakta Gaikwad enjoy summer vacation | प्राजक्ता गायकवाडने भर उन्हात खाल्ला हातगाडीवरचा गोळा; अभिनेत्रीने साधेपणाने जिंकली नेटकऱ्यांची मनं

प्राजक्ता गायकवाडने भर उन्हात खाल्ला हातगाडीवरचा गोळा; अभिनेत्रीने साधेपणाने जिंकली नेटकऱ्यांची मनं

googlenewsNext

'स्वराज रक्षक संभाजी', 'आई माझी काळूबाई' अशा कितीतरी मालिकांमध्ये झळकलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड. उत्तम अभिनयासह स्वभावातील साधेपणा यामुळे प्राजक्ता कायम प्रेक्षकांचं मन जिंकत असते. त्यामुळेच आज तिचा प्रचंड मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं. म्हणूनच, प्राजक्ताही सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या संपर्कात राहत असते. इतकंच नाही तर तिच्या आयुष्यातील लहान-मोठे प्रसंगही ती त्यांच्यासोबत शेअर करते.

सध्या कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी समर व्हेकेशन एन्जॉय करतायेत. त्यामुळे अनेकांनी समर लूकमध्ये किंवा त्यांच्या व्हेकेशनमधील काही फोटो शेअर केले आहेत. परंतु, या सगळ्यांमध्ये प्राजक्ताची पोस्ट चर्चेत येत आहे. प्राजक्ताने हा उन्हाळा एन्जॉय करण्यासोबतच तिच्या बालपणीच्या आठवणींनाही उजाळा दिला आहे.

दरम्यान, प्राजक्ताने भर उन्हाळात हातगाडीवरचा बर्फाचा गोळा खातानाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. सोबतच तिने त्याला साजेसं कॅप्शनही दिलं आहे. "उन्हाळ्याचे दिवस....खूप उष्णता #heat ..... अचानक #गोळा दिसला... आणि लहानपणीचे दिवस आठवले.... तुम्हाला आवडतो की नाही गोळा... #comments मध्ये नक्की सांगा ", असं कॅप्शन तिने या पोस्टला दिलं आहे.

Web Title: marathi actress Prajakta Gaikwad enjoy summer vacation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.