"सायबर क्राइमने चेक केल्यावर समजलं की..."; प्राची पिसाटचा खुलासा, सुदेश म्हशिलकर यांचं अकाऊंट हॅक झालं होतं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 11:58 IST2025-05-28T11:58:16+5:302025-05-28T11:58:57+5:30
प्राची पिसाटने सायबर क्राइमकडे सुदेश म्हशिलकर यांंचं अकाउंट हॅक झालं होतं का, याचा तपास केला. त्यानंतर मोठी माहिती समोर आली आहे

"सायबर क्राइमने चेक केल्यावर समजलं की..."; प्राची पिसाटचा खुलासा, सुदेश म्हशिलकर यांचं अकाऊंट हॅक झालं होतं?
सध्या मराठी मनोरंजन विश्वात अभिनेत्री प्राची पिसाटचं (prachi pisat) प्रकरण चांगलंच चर्चेत आहे. प्राची पिसाटने अभिनेते सुदेश म्हशिलकर (sudesh mhashilkar) यांच्या चॅटिंगचे स्क्रीनशॉट व्हायरल केले. त्यामुळे सर्वांना धक्का बसला. प्राचीने या प्रकरणाविरोधात आवाज उठवल्याने अनेक मराठी सेलिब्रिटींनी तिला सपोर्ट केला आहे. सुदेश म्हशिलकर यांचं अकाउंट हॅक झालं असल्याने तिला असे मेसेज आले, असंही बोललं जाऊ लागलं. त्याबद्दल प्राचीने सायबर क्राइम अधिकाऱ्यांना तपास करायला सांगितल्याने महत्वाची माहिती समोर आली.
सुदेश म्हशिलकर यांचं अकाउंट हॅक झालं होतं?
प्राचीने सोशल मीडियावर इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे पोस्ट करुन खुलासा केला. प्राची म्हणाली, "मी माझ्या बाजूने सायबर क्राइम अधिकाऱ्यांना विनंती करुन आधीच चेक आणि कन्फर्म केलं आहे की, त्यांचं अकाउंट खरंच हॅक झालं आहे की नाही? त्यावेळी सायबर क्राइम टीमने सांगितलं की, एप्रिल पासून त्यांचं अकाउंट हॅक झालं नव्हतं." असा खुलासा प्राचीने केलाय.
प्राची पुढे म्हणाली, "गेले ५ दिवस ते गप्प आहेत आणि हे प्रकरण मिटवण्यासाठी ते कोणतीच प्रतिक्रिया देत नसतील तर मीडियामध्ये जे काही छापून येतंय त्यासाठी माझी जबाबदारी नाही." असाही खुलासा प्राचीने केलाय.
प्रकरण नेमकं काय?
प्राचीने काही दिवसांपूर्वी तिच्या इन्स्टाग्रामवर स्क्रीनशॉट शेअर केले. यात सुदेश म्हशिलकर यांनी अभिनेत्रीला "तुझा नंबर पाठव...तुझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा झालीये...कसली गोड दिसतेस", असा मेसेज केला आहे. तर दुसऱ्या मेसेजमध्ये "खूपच सेक्सी दिसायला लागलीस हल्ली...वाह", असं सुदेश यांनी म्हटलं आहे. याविरोधात प्राचीने आवाज उठवला.
"...आणि मला हा स्क्रीनशॉट पोस्ट करायची इच्छा झाली. बायकोचा नंबर असेलच...ती ही गोड आहे. बघ जरा तिच्याशी फ्लर्ट करायला जमतंय का...मला धमकावून, प्रेशर आणून पोस्ट डिलीट करायला सांगून गप्प राहायला सांगितलं. त्यामुळेच मला वाटतं की ही पोस्ट आता माझ्या इन्स्टाग्राम फीडमध्ये असावी. चला विषय संपवुया...जोपर्यंत सुदेश म्हशिलकर गोड अपोलोजी पोस्ट करत नाही. ते देखील माझ्या नंबरवर नाही तर फेसबुकवर...माफी मागायची इच्छा नसेल आणि तुम्हाला वेळ असेल तर बाकीच्या मुलींनी सांगितलेले तुमचे किस्सेही सांगू शकते", अशी पोस्ट करुन प्राचीने सुदेश म्हशिलकर यांच्याविरोधात टीका केली.