'झपाटलेला' फेम अभिनेत्रीचं टेलिव्हिजनवर दमदार कमबॅक! 'हळद रुसली, कुंकू हसलं' मध्ये साकारणार लक्षवेधी भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 13:25 IST2025-06-22T13:22:15+5:302025-06-22T13:25:09+5:30
Halad Rusli Kunku Hasla: अभिनेत्री पूजा पवार यांचं टेलिव्हिजनवर दमदार कमबॅक! 'या' कलाकारांसह झळकणार

'झपाटलेला' फेम अभिनेत्रीचं टेलिव्हिजनवर दमदार कमबॅक! 'हळद रुसली, कुंकू हसलं' मध्ये साकारणार लक्षवेधी भूमिका
Halad Rusli Kunku Hasla New Promo: सध्या मराठी मालिकाविश्वात अभिनेत्री समृद्धी केळकर आणि अभिषेक रहाळकर यांच्या आगामी 'हळद रुसली, कुंकू हसलं' (Halad Rusli Kunku Hasla) या मालिकेची जोरदार चर्चा आहे. 'ती अस्सल गावरान आणि तो पक्का शहरी' असलेली ही हटके स्टोरी या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अशातच स्टार प्रवाह वाहनीने या मालिकेचा नवा प्रोमो शेअर केला आहे. मालिकेत समृद्धी केळकर आणि अभिषेक रहाळकर या दोन प्रमुख कलाकारांव्यतिरिक्त आणखी कोण झळकणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात बरीच उत्सुकता होती. अखेर मालिकेच्या एका नव्या प्रोमोतून याचा उलगडा झालेला आहे. या प्रोमोमधून मालिकेतील संपूर्ण स्टारकास्ट समोर आली आहे.
'हळद रुसली, कुंकू हसलं'ही बहुप्रतीक्षित मालिका दुपारच्या सत्रात प्रसारित केली जाणार आहे. येत्या ७ जुलैपासून सोमवार ते शनिवार दुपारी १.०० वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर येणार आहे. मालिकेच्या जिचं माहेर असं त्या कृष्णेचं सासर असेल कसं? असं कॅप्शन देत सोशल मीडियावर या मालिकेचा धमाकेदार प्रोमो शेअर करण्यात आला आहे. यापूर्वीच्या प्रोमोमध्ये समृद्धी केळकर आणि अभिषेक रहाळकर यांच्या पहिल्या भेटीची स्टोरी पाहायला मिळाली होती. त्यात आता या नव्या प्रोमोमध्ये संपूर्ण स्टारकास्ट
स्टार प्रवाहने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये दोन नवे चेहरे समोर आले आहेत. अभिनेता अभिषेक रहाळकरच्या आईच्या भूमिकेत अभिनेत्री पूजा पवार दिसणार आहेत. या मालिकेत त्यांची 'बाळजाबाई' अशी लक्षवेधी भूमिका आहे. त्यामुळे मालिकारसिक देखील कमालीचे उत्सुक आहेत. त्याचबरोबर माधवी जुवेकर, अमित परब आणि ज्योती निमसे असे कलाकार देखील पाहायला मिळणार आहेत.
दरम्यान, अभिनेत्री पूजा पवार हे मराठी कलाविश्वातील नावाजलेलं नाव आहे. 'झपाटलेला', 'सर्जा', 'धडाकेबाज' यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अलिकडेच त्या कलर्स मराठीवरील 'काव्यांजली' मालिकेत दिसल्या होत्या.