कॅन्सर सारख्या आजारावर खंबीरपणे मात केलीस...! मराठी अभिनेत्रीची आईसाठी भावुक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 09:51 IST2026-02-18T09:48:58+5:302026-02-18T09:51:09+5:30

टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईने कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर यशस्वी मात केलीये. अभिनेत्रीने आईचं कौतुक केलंय.

Marathi actress payal jadhav emotional post for her mother who win battle against cancer | कॅन्सर सारख्या आजारावर खंबीरपणे मात केलीस...! मराठी अभिनेत्रीची आईसाठी भावुक पोस्ट

कॅन्सर सारख्या आजारावर खंबीरपणे मात केलीस...! मराठी अभिनेत्रीची आईसाठी भावुक पोस्ट

मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे पायल जाधव. पायलने 'अबीर गुलाल' मालिकेतून चांगलीच लोकप्रियता मिळवली. याशिवाय 'पुन्हा शिवाजीराजे भोसले बोलतोय', 'थ्री ऑफ अस', 'मानवत मर्डर' अशा मराठी-हिंदी सिनेमांमधून आणि वेबसीरिजमधून पायलने काम केलं. पायलने नुकतंच सोशल मीडियावर तिच्या आईविषयी भावुक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये पायलच्या आईने कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर केलेली मात दिसून येतेय.

पायल जाधव लिहिते की, ''वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई. मला आज या गोष्टीचा फार आनंद आणि अभिमान आहे की कॅन्सर सारख्या आजारावर खंबीरपणे तू मात केलीस आणि पुन्हा अध्यापनाचं तुझं आवडतं काम सुरू ठेवलंस. आज खऱ्या अर्थाने तुझा वाढदिवस आहे असं मला वाटतयं. तुझ्या या सगळ्या प्रवासात तुझं लेकरू होता आलं याचं समाधान आहे.आज या निमित्ताने मी त्या सगळ्यांचे आभार मानते ज्यांनी तुला खूप आपलेपणानी मदत केली. आपल्या कुटुंबा बरोबर उभे राहिले. तुझ्या हातून शिक्षणाचं कार्य निरंतर घडत राहो.''


अशाप्रकारे पायलने पोस्ट लिहिली आहे. पायलने आईविषयी ही पोस्ट लिहून कॅन्सरशी झुंजणाऱ्या अनेकांसमोर एक उदाहरण समोर ठेवलंय. पायलच्या आईने कॅन्सरवर यशस्वी मात केलीय. याशिवाय इतक्या मोठ्या आजाराशी झुंज देऊन त्या पुन्हा एकदा त्यांच्या कामात सक्रीय झाल्या आहेत. पायलच्या करिअरमध्ये आई-बाबांचा नक्कीच वाटा आहे. मालिकेच्या शूटिंग सेटवरही पायलची आई तिला आवर्जून भेटायला येते.

Web Title : पायल जाधव ने अपनी माँ की कैंसर जीत पर भावुक पोस्ट साझा की।

Web Summary : मराठी अभिनेत्री पायल जाधव ने अपनी माँ के कैंसर से सफल लड़ाई के बारे में एक हार्दिक पोस्ट साझा की। उन्होंने अपनी माँ के लचीलेपन और शिक्षण में वापसी पर गर्व व्यक्त किया। पायल ने इस चुनौतीपूर्ण यात्रा के दौरान उनकी माँ का समर्थन करने वालों को धन्यवाद दिया, और उनकी प्रेरणादायक रिकवरी पर प्रकाश डाला।

Web Title : Payal Jadhav's emotional post for her mother's cancer victory.

Web Summary : Marathi actress Payal Jadhav shared a heartfelt post about her mother's successful battle against cancer. She expressed pride in her mother's resilience and return to teaching. Payal thanked those who supported her mother during this challenging journey, highlighting her inspiring recovery.