'नग्न झालं तर सिनेमात काम मिळतं का?' नेटकऱ्याच्या प्रश्नावर मराठी अभिनेत्री म्हणते, 'प्रयत्न करुन...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 11:47 IST2023-11-01T11:46:43+5:302023-11-01T11:47:50+5:30
मिताली मयेकरचे बोल्ड फोटो आणि त्यावरही नेटकऱ्यांच्या कमेंट्स हे नेहमीचंच झालंय.

'नग्न झालं तर सिनेमात काम मिळतं का?' नेटकऱ्याच्या प्रश्नावर मराठी अभिनेत्री म्हणते, 'प्रयत्न करुन...'
मराठी अभिनेत्री मिताली मयेकर (Mitali Mayekar) सध्या तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. बीचवरील बिकीनीतील फोटोंनी तिने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. या फोटोंवर तिला जबरदस्त ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. कालच तिने बीचवर झोपलेला एक फोटो पोस्ट केला. या फोटोवर नेटकऱ्याने कुचकटपणे कमेंट केली. मितालीनेही च्या कमेंटला सडेतोड उत्तर दिलंय.
मिताली मयेकरचे बोल्ड फोटो आणि त्यावरही नेटकऱ्यांच्या कमेंट्स हे नेहमीचंच झालंय. अनेक नेटकरी या फोटोंवर तिला मराठी संस्कृतीचे धडे देत आहेत. तर मितालीही त्यांना सडेतोड उत्तर देत आहे. नुकतंच तिने बीचवरचा एक फोटो पोस्ट केलाय ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. गुलाबी रेती आणि निळाशार समुद्र अशा नयनरम्य ठिकाणी तिने हे फोटोशूट केलंय. तिच्या या फोटोवर एकाने कमेंट केली की, 'नागडं झालं की फिल्ममध्ये काम मिळतं का?' मितालीनेही या कमेंटला सडेतोड उत्तर देत लिहिले, 'माहिती नाही बुवा! बघा प्रयत्न करुन.'
काम मिळवण्यासाठी कलाकार कोणत्याही थराला जातंच असाच अनेकांचा समज असतो. सध्या मिताली कोणत्याही सिनेमा, मालिकेत दिसत नाही. त्यामुळे नेटकऱ्यांनी तिच्यावर निशाणा साधलाय. मात्र मितालीनेही ट्रोलर्सची बोलती बंद केली आहे.