मकरसंक्रांतीच्या दिवशी मराठी अभिनेत्रीवर दु:खाचा डोंगर, घरातील जवळच्या व्यक्तीचं निधन, म्हणाली- "पप्पानंतर तुम्हीच होतात..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 13:01 IST2026-01-15T13:01:00+5:302026-01-15T13:01:48+5:30
मराठी अभिनेत्रीच्या घरातील जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त केलं आहे.

मकरसंक्रांतीच्या दिवशी मराठी अभिनेत्रीवर दु:खाचा डोंगर, घरातील जवळच्या व्यक्तीचं निधन, म्हणाली- "पप्पानंतर तुम्हीच होतात..."
नववर्षातील पहिला मकरसंक्रांतीचा सण सगळीकडेच मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. सगळीकडे गोडवा पसरवणारा हा सण मात्र मराठी अभिनेत्रीसाठी दु:खद ठरला आहे. मराठी अभिनेत्रीच्या घरातील जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त केलं आहे. अभिनेत्री मानसी सुरेशवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
मानसीच्या घरातील व्यक्तीचं मकरसंक्रांतीच्या दिवशीच निधन झालं आहे. "काका ( खरं तर आजोबा ) पप्पानंतर तुम्हीच होतात. मकरसंक्रांतीच्या एवढ्या चांगल्या दिवशी आमचा गोड माणूस सोडून गेलाय, मला विश्वास बसत नाहीये . जेवढं सोबत राहता आलं, करता आलं केलं. पण, अजून हवे होतात. बस्स ...आठवण काढत राहणार, तुमच्याबद्दल गप्पा मारत राहणार. आशिर्वाद असुद्या कायम 🙏🏻 भेटू पुन्हा", असं म्हणत अभिनेत्रीने भावुक पोस्ट शेअर केली आहे.
मानसी सुरेश हा मराठी टेलिव्हिजनवर ओळखीचा चेहरा आहे. अनेक मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. शिवा, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकांमध्ये ती दिसली होती. मानसी सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं दिसतं. करिअर आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स ती पोस्टद्वारे चाहत्यांना देत असते.