मराठी अभिनेत्रीसाठी चाहत्याने कापली हाताची नस; अभिनेत्रीने सांगितला भयानक अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2023 15:23 IST2023-07-06T15:22:35+5:302023-07-06T15:23:12+5:30

Marathi actress: 'देवमाणूस', 'तुझ्यात जीव रंगला' या आणि अशा अनेक मालिकांमध्ये ती झळकली आहे.

marathi actress madhuri pawar weird fan moment man cut his vein | मराठी अभिनेत्रीसाठी चाहत्याने कापली हाताची नस; अभिनेत्रीने सांगितला भयानक अनुभव

मराठी अभिनेत्रीसाठी चाहत्याने कापली हाताची नस; अभिनेत्रीने सांगितला भयानक अनुभव

'देवमाणूस', 'तुझ्यात जीव रंगला' या आणि अशा अनेक मालिका, रिअॅलिटी शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असलेली अभिनेत्री म्हणजे माधुरी पवार. उत्तम अभिनयशैली आणि नृत्यकौशल्याच्या जोरावर माधुरीने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे तिला भेटण्यासाठी चाहते वाट्टेल ते करायला तयार असतात. यात अलिकडेच तिने एका चाहत्याचा तिला आलेल्या विचित्र अनुभवाविषयी भाष्य केलं. या चाहत्याने चक्क तिच्यासाठी हाताची नस कापून घेतली.

अलिकडेच माधुरीने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिला कोणता विचित्र चाहता भेटला का किंवा असा काही अनुभव आला का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने हा किस्सा शेअर केला.

"माझा एक चाहता होता जो ओळख वाढल्यामुळे माझा मित्र झाला. पण, पुढे तो वारंवार माझ्यावर लग्नासाठी दबाव टाकू लागला. इतकंच नाही तर त्याने त्याच्या हाताची नसही कापून घेतली होती आणि त्याचे फोटो मला पाठवले. त्यावेळी मला फार विचित्र वाटलं होतं. त्याचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून त्याने असं केलं असावं असं मला वाटत नाही", असं माधुरी म्हणाली.

पुढे ती म्हणते, "स्वत:च्या शरीराचं नुकसान करुन घेणं मला अजिबात आवडत नाही आणि त्याने तेच केलं. तो एक चाहता होता, मग मित्र झाला आणि मग नंतर अशा गोष्टी केल्या. हा फार विचित्र अनुभव होता." दरम्यान, माधुरीने  'तुझ्यात जीव रंगला' ,'देवमाणूस', 'रानबाजार''अप्सरा आली'  असा कितीतरी मालिका, रिअॅलिटी शोमध्ये झळकली आहे.
 

Web Title: marathi actress madhuri pawar weird fan moment man cut his vein