"माझ्या घरात मालिका पाहत नाहीत" मधुराणीने सांगितलं यामागचं कारण, तर तिची आई म्हणते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2024 18:51 IST2024-03-24T18:51:29+5:302024-03-24T18:51:55+5:30

'आई कुठे काय करते' मालिका घरोघरी पाहत असतानाच मधुराणीच्या घरी मात्र ती लावली जात नाही.

marathi actress Madhurani Prabhulkar says no one in her family watch Aai Kuthe Kay Kartein Marathi serial | "माझ्या घरात मालिका पाहत नाहीत" मधुराणीने सांगितलं यामागचं कारण, तर तिची आई म्हणते...

"माझ्या घरात मालिका पाहत नाहीत" मधुराणीने सांगितलं यामागचं कारण, तर तिची आई म्हणते...

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Kartein) मध्ये भलतंच वळण आलं आहे. आशुतोषचं निधन झालेलं दाखवल्याने प्रेक्षकांचा संताप झाला आहे. मालिकेतील मुख्य अभिनेत्री मधुराणी प्रभूलकर (Madhurani Prabhulkar) हिने नुकतंच तिच्या घरी मालिका पाहिली जाते का यावर आश्चर्यकारक उत्तर दिलंय. टीआरपीमध्ये कित्येक दिवस नंबर एक ला असलेली मालिका तिच्याच घरचे का पाहत नाहीत याचा तिने खुलासा केला. 

मधुराणी प्रभुलकर 'आई कुठे काय करते' मालिकेतून घराघरात पोहोचली. पण तिच्या स्वत:च्याच घरात ही मालिका लावली जात नाहीय. 'कलाकृती मीडिया'शी बोलताना ती म्हणाली, " माझ्या घरात तेवढं पाहत नाही. माझी मुलगी लहान आहे. त्यामुळे आमच्या घरात टीव्ही तेवढा चालत नाही. ती तिच्या वयाचाच कंटेंट बघते. पण माझी आई मध्येमध्ये बघत असते. तिचं असतं मग त्यावर आता काय नवीन? किती संकटातून तुला पाठवणार आहेत? किती रडणार आहे तू? असं ती म्हणत असते."

मधुराणीच्या मुलीचं नाव स्वराली आहे. ती लेकीसोबत अनेकदा फोटो शेअर करत असते.  तसंच दोघी ट्रीपवरही जात असतात. तर विजया गोखले या मधुराणीच्या आई आहेत. त्या प्रसिद्ध शास्त्रीय गायिका आहेत. त्यांच्याकडूनच मधुराणीलाही गाण्याची आवड मिळाली आहे.

Web Title: marathi actress Madhurani Prabhulkar says no one in her family watch Aai Kuthe Kay Kartein Marathi serial