मराठमोळा साजशृंगार अन् पैठणीचा थाट! माधवी निमकरचा महाराष्ट्रीय लूक पाहून पडाल तिच्या प्रेमात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 19:45 IST2022-07-28T19:45:00+5:302022-07-28T19:45:00+5:30
Madhavi nimkar: माधवीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये ती हिरव्या रंगाच्या पैठणीमध्ये दिसत असून त्यावर साजेसा मराठमोळा साजशृंगार केला आहे.

मराठमोळा साजशृंगार अन् पैठणीचा थाट! माधवी निमकरचा महाराष्ट्रीय लूक पाहून पडाल तिच्या प्रेमात
'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asata) या मालिकेच्या माध्यमातून दररोज प्रेक्षकांच्या भेटीला येणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे माधवी निमकर. या मालिकेत शालिनी ही नकारात्मक भूमिका साकारुनही माधवीने लोकप्रियता मिळवली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर ती कायम चर्चेत असते.
कलाविश्वात सक्रीय असलेली माधवी सोशल मीडियावरही कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे अनेकदा ती तिचे ग्लॅमरस फोटो वा व्हिडीओ शेअर करत असते. यावेळी तिने असाच एक मनमोहक व्हिडीओ शेअर केला आहे. हिरव्या रंगाच्या पैठणीमध्ये तिने एक छानसं फोटोशूट केलं आहे. हे फोटोशूट करत असतानाच तिने व्हिडीओदेखील शूट केला आहे.
माधवीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये ती हिरव्या रंगाच्या पैठणीमध्ये दिसत असून त्यावर साजेसा मराठमोळा साजशृंगार केला आहे. तसंच 'फना' चित्रपटातील 'ये साजिश है बूंदों' की या गाण्यावर तिने हा व्हिडीओ शूट केला आहे.
दरम्यान, माधवीच्या या व्हिडीओला चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत या व्हिडीओला १७ हजारांपेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत. माधवी मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने आतापर्यंत अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे.